कंगनाकडून मुख्यमंत्र्यांच्या 'या' निर्णयाचं स्वागत

ट्विट करून केलं कौतुक 

Updated: Sep 19, 2020, 05:46 PM IST
कंगनाकडून मुख्यमंत्र्यांच्या 'या' निर्णयाचं स्वागत

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतने शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं कंगनाने स्वागत केलं आहे. कंगनाने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेच्या क्षेत्रात एक फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 'क्वीन' सिनेमातील अभिनेत्री कंगनाने मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. 

कंगनाने ट्विट करून या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामध्ये कंगनाने म्हणते की,'सिने उद्योगात खूप मोठा बदल होण्यास मदत होईल. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचं मी कौतुक करते. सिनसृष्टीत अनेक बदल आवश्यक आहेत. आपण अनेक कारणांमुळे विभागले आहोत. त्यामुळे याचा फायदा हॉलिवूडला मिळतो. एका इंडस्ट्रीत अनेक फिल्म सिटीज आहेत.'

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी मेरठ मंडळ विकास समीक्षेच्या दरम्यान याची घोषणा केली. देशाला सिनेमांच्या शुटिंगकरता एक चांगल्या फिल्म सिटीची आवश्यकता आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवे ही क्षेत्र या उद्देशाने चांगली जागा आहे.