'महिला फक्त शारिरीक सुखासाठी...', सुब्रमण्यम स्वामी यांच्या खोचक टीकेवर कंगनाची संतप्त पोस्ट

Kangana Ranut slams Subramanian Swamy : कंगना रणौतनं माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पोस्ट शेअर करत केलेल्या टीकेवर कंगनानं संतप्त पोस्ट शेअर केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 27, 2023, 11:23 AM IST
'महिला फक्त शारिरीक सुखासाठी...', सुब्रमण्यम स्वामी यांच्या खोचक टीकेवर कंगनाची संतप्त पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranut slams Subramanian Swamy : नुकताच दसऱ्याचा सण पार पडला त्यानिमित्तानं दिल्लीच्या लव कुश रामलीला मैदानात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही रावण दहनसाठी पोहोचली होती. इतकंच नाही तर ती रावण दहन करणारी पहिली महिला देखील ठरली आहे. अर्थतज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी कंगनानं या कार्यक्रमात येण्यावर कमेंट केली आहे. यावेळी ते कंगना विषयी बोलताना म्हणाले की एसपीजी गॉसिपनुसार ती एक 'फ्रिक्वेंट फ्लायर' आहे. त्यावर आता कंगणानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगना विषयी बोलत सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये कंगनाचा एक फोटो आहे. तर त्यावर कंगना विषयी बोलताना ते म्हणाले की 'एसपीजीमध्ये चर्चा आहे की ही नुसतं उडत राहते. आता एसपीजीत अशी चर्चा का बरं होत असेल? कारण हेच की या दलाला आजकाल खूप जास्त काम करावं लागतंय. तिला रामलीलेत चीफ गेस्ट म्हणून बोलावणं आणि त्या ठिकाणी एसपीजीच्या कामाचं कौतुक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून करावं लागेल.'

त्यांची ही पोस्ट पाहता कंगनानं त्यावर भूमिका घेत एक्स अकाऊंटवरून रिप्लाय दिला आहे. 'फोटो आणि काहीशा भुलवणाऱ्या ओळी हेच दर्शवतात की माझ्याकडे राजकारणाला देण्यासाठी शरीराशिवाय देण्यासाठी दुसरं काहीच नाही हा, हा. मी एक कलाकार आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आणि लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि क्रांतिकारी इन्फ्लुएन्सर आहे. जर माझ्याजागी कोणी दुसरी तरुण असता, जो पुढे जाऊन एक मोठा नेता होऊ शकत होता, आणि चांगला मार्गदर्शन त्यासोबतच कोणत्याही गोष्टीत सल्ला देण्या योग्य असता. तर तुम्हाला तेव्हाही तुम्हाला वाटले असते का की तो राजकारणात येण्यासाठी त्यानं त्याच्या शरीराचा सौदा करत आहे. तुझा पुरुषी अहंकार आणि महिलेविषयी असलेली वासना या दोन्ही गोष्टी तुम्हाला वासनांध व्यक्तीमत्त्व बनवते. महिला या फक्त शारिरीक सुखासाठी नाही, त्यांचे इतर अवयव देखील आहेत, उदा. मेंदू, हृदय, हात, पाय आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या एका पुरुषाजवळ असतात. एक महान राजकारणी बनण्यासाठी हे महत्त्वाचं आहे', असं कंगना त्यांना उत्तर देत म्हणाली. 

हेही वाचा : थलपती विजयच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' आणि 'जेलर'ला पछाडलं

कंगनाच्या कामाविषयी बोलायचं झालं की कंगना लवकरच 'तेजस' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यानंतर कंगना ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तिचं करत आहे.