...म्हणून स्वराला 'चापलूस' म्हणाली कंगना

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.   

Updated: Jun 30, 2020, 09:02 PM IST
...म्हणून स्वराला 'चापलूस' म्हणाली कंगना

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूते १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याचा सामना करत होता. असं असतानाच घराणेशाहीमुळं त्याच्या कारकिर्दीत एक अनपेक्षित टप्पा आल्याचंही बोललं गेलं. याच पर्श्वभूमीवर दिग्दर्शक करण जोहरला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात येत आहे. शिवाय अभिनेत्री कंगना रानौतने देखील त्याच्यावर निशाणा साधला. सर्वच बाजूंनी ट्रोल होत असताना अभिनेत्री स्वरा भास्करने  त्याची बाजू घेतली. स्वराने करणची बाजू घेतल्याने कंगनाने तिला ‘चापलूस’ म्हणत टोला लगावला आहे.

स्वराने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होत की, 'कोणाच्या मृत्यूसाठी इंडस्ट्रीतल्या लोकांना जबाबदार ठरवणं चुकीचं आहे.'  शिवाय तिने करणचा व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. यावर कंगनाने स्वराला चापलूस म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. 

कंगना म्हणाली, 'स्वराने चापलूसी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवावं की, माझ्याकडे त्या शोमध्ये भाग घेण्यासाठी अनेकदा विनंती करण्यात आली होती. म्हणून मी त्या शोमध्ये भाग घेतला. कंगना एक सुपरस्टार आहे आणि करण जोहर एक पेड होस्ट. ' असं म्हणत कंगनाने स्वरा भास्करवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, स्वराच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला चांगलचं ट्रोल करायला सुरवात केली आहे. आपण ट्रोल होत असल्याचं लक्षात येताच स्वराने ट्विट डिलिट केलं आहे.