मुंबई : एका वादग्रस्त मुलाखतीनंतर आता कंगणा रणावत पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. एका मुलाखतीमध्ये कंगणाने आदित्य पांचोली आणि ऋतिक रोशन सोबतच्या संबंधांवर खुल्याने वक्तव्य केली. त्यानंतर आदित्य पंचोलीनेही कंगनाला लीगल नोटीस पाठवली.
वादग्रस्त मुलाखतींनंतर आता कंगणाचे नाव पुन्हा चर्चेत येण्यामागील कारण वेगळं आहे. नुकताच कंगणाने पाली हिल भागात एक बंगला विकत घेतला आहे. मात्र या बंगल्याचा वापर राहण्याऐवजी ती प्रोडक्शन हाऊससाठी करणार आहे. या प्रोडक्शन हाऊसचा वापर मणिकर्णिका या चित्रपटाचे कार्यालय म्हणून केला जाणार आहे.
नर्गिस दत्त रोडवरील या बंगल्याची किंमत सुमारे २०.७ कोटी आहे. कंगणा रणावत सध्या मणिकर्णिका या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित आहे. कंगणा या चित्रपटात लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे.