close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांसह चित्रपट साकारण्याची कंगनाची इच्छा

कंगना तिच्या आगामी 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.

Updated: Jul 21, 2019, 07:28 PM IST
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांसह चित्रपट साकारण्याची कंगनाची इच्छा

मुंबई : बॉलिवूड मधील प्रत्येक अभिनेत्रीचं एक स्वप्न कायम असतं, ते म्हणजे बॉलिवूडमधील तीन खानसह चित्रपटामध्ये झळकण्याचं. परंतू, सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री कगंना रानौतला 'सिम्बा' फेम अभिनेता रणवीर सिंग आणि 'उरी' फेम अभिनेता विकी कौशल सह स्क्रिन शेअरण्याची इच्छा आहे. तिने कपिलच्या कॉमेडी शोमध्ये आपली इच्छा व्यक्त केली आहे. सध्या कंगना तिच्या आगामी 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखती दरम्यान तिने अभिनेत्री दीपिका पोदुकोनवर निशाणा साधला होता. त्यानंतर तिने दीपिकाचा पती रणवीर सोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता कोणत्या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, 'जजमेंटल हैं क्या' चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एका पत्रकाराशी झालेला वाद अद्यापही शमण्याचे नाव घेत नाही. एकीकडे पत्रकरांनी कंगनाचा चित्रपट बॅन करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे कंगनाने पत्रकाराची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे.