Olympic medal-winning wrestler Bajrang Punia suspended: भारताचा टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया बाबतीत एक वाईट बातमी समोर आली आहे. बजरंग पुनिया पुढील चार वर्षे कुस्तीच्या रिंगणात दिसणार नाही. याचे कारण असे की नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) या त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घातली आहे. ज्या गुन्ह्यासाठी त्याला NADA ने यापूर्वी 23 एप्रिल रोजी बजरंगला निलंबित केले होते, आता त्याच कारणासाठी त्याला पुन्हा निलंबित करण्यात आले आहे. 23 एप्रिलला NADA नंतर त्याला UWW ने देखील त्याला निलंबित केले होते.
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) या भारतीय कुस्तीपटूवर 4 वर्षांची बंदी घातली आहे. डोपिंगविरोधी संहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. या गुन्ह्यासाठी NADA ने यापूर्वी 23 एप्रिल रोजी कांस्यपदक विजेत्या बजरंगला निलंबित केले होते, त्यानंतर UWW ने देखील त्याला निलंबित केले होते. परंतु बजरंगने तात्पुरत्या निलंबनाविरुद्ध अपील केले होते आणि NADA च्या डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने (ADDP) 31 मे रोजी ते रद्द केले आणि 23 जून रोजी कुस्तीपटूला नोटीस पाठवली.
हे ही वाचा: तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादी
नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी बजरंग पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने बजरंगला अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रभारी बनवले. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बजरंगने 11 जुलै रोजी सुरुवातीच्या हंगामी निलंबनाला विरोध करत NADAला लेखी आव्हान दिले होते. यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत ADDP ने मान्य केले की बजरंगला कलम 10.3.1 अंतर्गत प्रतिबंधासाठी जबाबदार आहे. यासाठी ADDP ने त्यांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरवले.
हे ही वाचा: IPL लिलावात नवऱ्याला खरेदी न केल्याने संतापली पत्नी, शाहरुखच्या टीमवर काढला राग!
या निलंबनाचा अर्थ असा आहे की तो यापुढे कोणत्याही स्पर्धात्मक कुस्तीमध्ये भाग घेऊ शकणार नाही. याशिवाय, त्यांना परदेशात कोचिंगच्या संधी शोधण्याची संधीही मिळणार नाही.