The Kapil Sharma Show मधल्या चंदू चायवालाला लागला मोठा जॅकपॉट

सलमान, शाहरूख, अक्षय खानला जे जमलं नाही ते आता 'The Kapil Sharma Show' मधला चंदू चायवाला करून दाखवणार

Updated: Aug 9, 2022, 05:54 PM IST
The Kapil Sharma Show मधल्या चंदू चायवालाला लागला मोठा जॅकपॉट title=

मुंबई : अभिनेता, कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या 'द कपिल शर्मा शो'मधून घराघरात पोहोचलेल्या चंदू चायवाला अर्थातच चंदन प्रभाकरने (Chandan Prabhakar) आपल्या अॅक्टींगच्या जोरावर कॉमेडी विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कपिल शर्मा (Kapil Sharma) शोमुळे त्याला एक नविन ओळख मिळाली आहे. या चंदूची आता चांदी झाली आहे. कारण त्याला एक मोठी लॉटरी लागली आहे. 

चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) हा द कपिल शर्मा शोचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे चंदू चायवालाचे पात्र लोकांना खूप आवडते. कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) आता अभिनय विश्वात आपला ठसा उमटवताना दिसणार आहे. चंदन प्रभाकर आता ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. 

हिंदी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये चंदन प्रभाकर प्रसिद्ध चित्रपट निर्माते लकी हंसराज आणि निर्माती कोमल उनवायसोबत दिसत आहेत. 

चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) हा लक्की हंसराजच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या कॉमेडी वेब सीरिजचा महत्त्वाचा भाग असणार आहे. चंदूच्या या पदार्पण ओटीटी मालिकेचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. लवकरच चंदन प्रभाकर अभिनयात पदार्पण करणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

संघर्षाची कहाणी
चंदन प्रभाकरने (Chandan Prabhakar) खुप संघर्ष केला आहे. चंदनने प्रसिद्ध टीव्ही शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 3 मध्ये उपविजेता ठरला होता. यानंतर देखील चंदनला पुढे काम मिळाले नव्हते. त्याने या दरम्यान खुप उतार-चढाव पाहिले. पण द कपिल शर्मा शोनंतर चंदनचे नशीब चमकले. आता तो ओटीटी विश्वात पदार्पण करतोय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे.