परिणीतीचं लवकर ठरणार लग्न? खास व्यक्तीकडून खुलासा

परिणीती चोप्राची लगीन घाई...  

Updated: Jan 17, 2022, 09:29 AM IST
परिणीतीचं लवकर ठरणार लग्न? खास व्यक्तीकडून खुलासा title=

मुंबई : सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहात आहेत. त्यामुळे अभिनेत्री परिणीती चोप्रा कधी लग्न करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी परिणीतीचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण दिग्दर्शक करण जोहरने याबाबत मोठा खुलासा केला आहे. करणने 'हुनरबाज' शोच्या एका प्रोमोमध्ये परिणीतीच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. 

 'हुनरबाज' शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करण म्हणतोय, 'मी कपलसाठी अत्यंत लकी आहे. महत्त्वाचं म्हणजे मॅचमेकिंग करण्यामध्ये मी प्रचंड यशस्वी आहे....'

यावर परिणीती म्हणते, 'करण तू कधी माझं मॅच मेकिंग केलं नाही.' पुढे करण म्हणतो, 'आगे-आगे देखो होता है क्या... तुझं देखील यंदाच्या वर्षी नक्की होईल...' त्यामुळे परिणीती कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शोच्या प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'परिणीतीसाठी करण झाला मॅचमेकर... तो शोधू शकेल का परिणीतीसाठी मुलगा...'

परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटात काम करत आहे. चित्रपटात परिणीती महानायक  अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी जोंगपा यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. 

याशिवाय परिणीती संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ऍनिमल' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार असणार आहेत.