करण जोहरला 'या' कारणामुळे मागावी लागली माफी

काय आहे नेमकं कारण...  

Updated: Nov 27, 2020, 08:52 AM IST
करण जोहरला 'या' कारणामुळे मागावी लागली माफी

मुंबई : एंटरटेन्मेंट विश्वात बड्या कलाकारांमध्ये कायम तू-तू, मैं-मैं होत असते. आता फिल्म मेकर करण जोहर आणि मधुर भंडारकर यांतील वाद चांगलाचं पेटला आहे. वाद इतका टोकाला गेला की चक्क करण जोहरला नमतं घेवून  मधुर भंडारकर यांची माफी मागावी लागली. दरम्यान काही दिवसांपूर्वी भंडारकर यांनी करण जोहरवर त्यांच्याद्वारे रजिस्टर करण्यात आलेले शिर्षक वापरल्याचे आरोप लावले होते. हे शिर्षक परवानगी शिवाय वापरण्यात आल्याचं देखील भंडारकर म्हणत होते. 

त्यामुळे भंडारकर यांची नाराजी दूर करत करणने आपल्या चूकीची माफी मागितली आहे. करणने ट्विटरच्या माध्यमातून फिल्ममेकर मधुर भंडारकर यांची माफी मागितली आहे. तो म्हणला, 'आपलं नातं फार वर्षांपूर्वीचं आहे. मला तुमचं काम देखील फार आवडतं. मी नेहमीचं तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत.' असं करण म्हणत आहे. 

तुम्ही माझ्यामुळे अडचणीत आहात आणि मी त्यासाठी माफी मागत असल्याचे सांगत करण म्हणाला, 'मी माझ्या सीरिजसाठी 'द फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स' (The Fabulous Lives of Bollywood Wives)' हे नाव निवडलं आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हा वाद विसराल. 

करणच्या या ट्विटवर भंडारकर यांनी देखील उत्तर दिलं आहे. 'कला विश्व हे फक्त अतूट नात्यावर टिकून आहे. शिर्षक रजिस्टर करण्यात आलं होतं. यासंदर्भात आपलं बोलणं देखील झालं होतं पण तरी देखील तुझ्याकडून चूक झाली. त्यामुळे मला फार दुःख झालं. पण आता मी तुझी माफी स्वीकारत आहे.' असं म्हणत भंडारकर यांनी या वादाला पूर्णविराम लावला.