विक्रम भट यांच्या "१९२१" या हॉरर सिनेमाचा ट्रेलर रिलीज

विक्रम भट्टचा नवा सिनेमा "१९२१" चा अफलातून ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 11, 2017, 04:39 PM IST
 विक्रम भट यांच्या "१९२१" या हॉरर सिनेमाचा ट्रेलर रिलीज  title=

मुंबई : विक्रम भट्टचा नवा सिनेमा "१९२१" चा अफलातून ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

या सिनेमांत करण कुंद्रा आणि जरीन खान लीड रोलमध्ये असणार आहे. या सिनेमांत आयुष नावाच्या मुलाच्या अवती भवती हा सिनेमा फिरतो. आयुष भारतातून इंग्ल्डमध्ये म्युझिक शिकण्यासाठी जातो. सगळं अगदी व्यवस्थी सुरू असतं मात्र एक दिवस अचानक त्याच्या जीवनात एक अशी घटना घडते आणि त्याचं संपूर्ण आयुष्यचं बदलून जातं. 

त्यानंतर त्याची ओळख रोझ नावाच्या मुलीशी होती. जी मुलगी भटकलेल्या आत्माला पाहू शकते. आणि त्यांना मुक्ती देण्यासाठी ती मदत करते. आयुष रोझकडे मदत मागतो. आणि ती देखील मदत करण्यास तयार होते. मात्र रोझ त्या आत्माला मदत करते की नाही हे या सिनेमांत पाहण्यासारखं आहे. या हॉरर सिनेमांत तुम्हाला हॉलिवूड सिनेमांचा टच पाहायला मिळेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x