Nisha Rawal चा स्वत:वर हल्ला, पती Karan Mehra चा मोठा खुलासा

ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये नैतिकची भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

Updated: Oct 1, 2021, 11:35 AM IST
 Nisha Rawal चा स्वत:वर हल्ला, पती Karan Mehra चा मोठा खुलासा title=

मुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये नैतिकची भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनयाने मने जिंकणाऱ्या करण मेहरावर त्याच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी निशा रावल जखमी अवस्थेत माध्यमांसमोर आली आणि तिने करण मेहराने तिच्यावर कसा हल्ला केला हे सांगितले.

मुलाखतीत अभिनेत्याने पत्नी निशा रावलचे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. करण मेहराच्या म्हणण्यानुसार, निशाने स्वत: ला दुखवले आहे. ज्यासाठी त्याच्याकडे पुरावे आहेत.

निशाला झालेल्या दुखापतीबद्दल बोलताना करण मेहरा यांनी सांगितले, 'एका रात्री निशा आणि रोहित साठिया माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्याशी धमकीच्या पद्धतीने बोलले. मला भडकवण्यासाठी निशाने माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली पण मी माझा ताबा गमावला नाही.

मी दोघांना कंटाळून वॉशरूममध्ये गेलो आणि बाहेर आल्यावर निशाच्या डोक्याला दुखापत झाली होती. तिने स्वत: ला दुखवले आणि मला दोष दिला. मी रोहितला रक्त थांबवायला सांगितले पण त्याने फोनवरून फोटो काढायला सुरुवात केली.

करणने मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, निशाने एफआयआरमध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि तिने माध्यमांना सांगितलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. अभिनेत्याचा दावा आहे की त्याच्याकडे निशाच्या विरोधात पुरावे आहेत, जे त्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.