पतीच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा या कारणामुळे पुन्हा चर्चेत

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तुफान चर्चेत आहे. 

Updated: Oct 1, 2021, 10:16 AM IST
पतीच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा या कारणामुळे पुन्हा चर्चेत title=

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तुफान चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे. पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा पूर्णपणे गायब झाली होती. पण दोन महिन्यानंतर जामीन मंजूर झाल्यानंतर याप्रकरणी राज कुंद्राकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान शिल्पा मात्र सोशल मीडियावर रोज एकतरी पोस्ट शेअर करते. आता देखील तिची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये शिल्पा समुद्र किनारी धावताना दिसत आहे. मात्र अनेकांनी या व्हिडिओवर टीका केली आहे. एक युझर कमेन्ट करत म्हणाला, 'तू कायम फिटचं असतेस...' तर दुसरा युझर म्हणाला, 'आता पळून काही उपयोग नाही...' शिल्पाचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 दरम्यान, पती पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यामुळे शिल्पा देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली. शिल्पाला देखील चौकशीचा सामना करावा लागला. पती तुरूंगात असल्यामुळे शिल्पा देखील सोशल मीडियापासून दूर होती. पण गेल्या काही दिवसांपासून तिने चित्रीकरणाला देखील सुरूवात केली आहे.