Kareena Kapoor च्या दुसऱ्या मुलाचा फोटो लीक, रणधीर कपूर यांनी चुकून केला फोटो पोस्ट

करीनाच्या दुसऱ्या मुलाची चर्चा 

Updated: Apr 6, 2021, 11:07 AM IST
Kareena Kapoor च्या दुसऱ्या मुलाचा फोटो लीक, रणधीर कपूर यांनी चुकून केला फोटो पोस्ट

मुंबई : करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) ने आपल्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर अद्याप शेअर केलेला नाही. या मुलाची झलक आजोबा रणधीर कपूरने सोशल मीडियावर चुकून पोस्ट केला. तेव्हा सैफीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो लीक झाला. मात्र ही चूक त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ हा फोटो डिलिट केला आहे. 

रणधीर कपूर यांनी आपल्या ग्रँडसन म्हणजे नातवाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र असं लक्षात आलं की, रणधीर कपूर यांनी हा फोटो चुकून पोस्ट केली आहे. कारण त्यांनी अगदी काही वेळातच हा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलिट केला. मात्र चाहत्यांनी हा फोटो स्क्रिनशॉर्ट काढून ठेवला आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या अगोदर अभिनेत्री करीना कपूर खानने न्यूबॉर्न बेबीचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र त्यामध्ये तिचा चेहरा दिसत नाही. 21 फेब्रुवारी रोजी करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. करीनाची डिलिव्हरी ब्रीच कँडी रुग्णालयात झाली आहे. करीना आणि सैफ यांना याआधी एक मुलगा असून 2016 मध्ये त्याचा जन्म झाला. तैमूर हा सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय आहे. तैमूर पाठोपाठ चाहते आता दुसऱ्या मुलाचा चेहरा बघण्यास उत्सुक आहे.  

अजून करीना कपूर खानने आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलेलं नाही. करीनाने तैमूरचं नाव ठेवल्यावर खूप टीका झाली होती. यामुळे आता करीना दुसऱ्या मुलाचं नाव ठेवणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.