गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका 27 वर्षीय तरुणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने ऑडिओ नोट्स मागे सोडल्या आहेत. यामध्ये त्याने तिच्या प्रियकराची माफी मागितली आहे. घरातील भांडणांमुळे आपण कंटाळलो आहोत असं तिने यात सांगितलं आहे. ब्युटी पार्लर चालवणारी राधा ठाकोर काही वर्षांपूर्वी तिच्या पतीपासून विभक्त झाली होती आणि पालनपूरमध्ये बहिणीसोबत राहत होती.
"माझी बहीण ब्युटी पार्लर चालवत होती. रविवारी रात्री ती घरी परतली, जेवली आणि त्यानंतर आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती मृतावस्थेत सापडली. आम्ही जेव्हा तिचा फोन चेक केला, तेव्हा तिने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सापडले. आम्ही या सर्व गोष्टी पोलिसांकडे सोपवल्या आहेत. ती ज्या व्यक्तीशी बोलत होती त्याच्यावरच आम्हाला संशय आहे," असं राधाची बहीण अलकाने म्हटलं आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारण कुटुंबाने आपण त्यांना ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.
पोलीस तरुणीने आत्महत्या का केली आणि तिने व्हिडीओत माफी का मागितली आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटच्या संवादात राधा समोरील व्यक्तीकडे फोटो मागत असल्याचं ऐकू येत आहे. तिच्या कुटुंबाने सांगितलं आहे की, ती त्याच्याकडे फोटो मागत असताना, तो मात्र पाठवत नव्हता. रेकॉर्ड झालेल्या कॉलमध्ये ती सांगत आहे की, "जर तू 7 वाजेपर्यंत फोटो पाठवला नाही तर काय होतं ते बघ".
आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओत तिने आपल्या प्रियकराची माफी मागितली आहे. "मला माफ कर, मी तुला न विचारता चुकीचं पाऊल उचलत आहे. नाराज होऊ नकोस, आनंदी राहा, आयुष्याची मजा घे आणि लग्न कर. मी आत्महत्या केल्याने मृत्यू झाला असं समजू नकोस. मी दोन्ही हात जोडून माफी मागते. जर तू आनंदी असशील तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी काम आणि आयुष्यामुळे त्रस्त असून यामुळेच हे पाऊल उचलत आहे," असं तिने सांगितलं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला 34 वर्षीय तंत्रज्ञ अतुल सुभाष यांच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्य समस्या आणि आत्महत्या यावर चर्चा सुरु असतानाच या महिलेने आत्महत्या केली आहे. . सुभाष यांनी 80 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि 24 पानांची चिठ्ठी मागे ठेवली, ज्यामध्ये त्याची पत्नी निकिता आणि तिच्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा छळ केल्याचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.