मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री करिना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. करीना कपूर खान आणि सैफ अली खान दोन्ही मुलांसोबत बराच काळ लंडनमध्ये आहे. नुकतीच करीना तिच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. यासोबतच अभिनेत्रीचा एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमुळे करिना पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पण करीनाच्या एका पोस्टने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. करीनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने प्रेग्नेंट नसल्याचा खुलासा केला आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र करीनाच्या पोस्टची चर्चा आहे.
इन्स्टा स्टोरीमध्ये करीना म्हणते, 'शांत राहा, मी प्रेग्नेंट नाहीय... सैफचं म्हणणं आहे त्याने आधीच लोकसंख्या वाढीत जास्त योगदान दिलं आहे'. करीनाच्या पोस्टवरून अभिनेत्री प्रेग्नेंट नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
सांगायचं झालं तर, अभिनेता सैफ अली खान चार मुलांचा बाबा आहे. सैफची पहिली पत्नी अमृता सिंगला एक मुलगा इब्राहिम अली खान आणि मुलगी सारा अली खान आहे. तर सैफची दुसरी पत्नी करीनाला दोन मुलं आहे. सैफ आणि करीनाच्या मुलांची नाव तैमुर आणि जेह असं आहे. करीना कायम सोशल मीडियावर मुलांसोबत फोटो पोस्ट करत त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करताना दिसते.