करिश्मा - संदीपच्या लग्नाची तारीख ठरली?

करिश्मा आणि संदीपच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत

Updated: Jul 25, 2018, 11:53 AM IST
करिश्मा - संदीपच्या लग्नाची तारीख ठरली?

मुंबई : पतीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं नाव उद्योजक संदीप तोषनीवाल याच्यासोबत जोडलं जात होतं... यानंतर आता करिश्माच्या लग्नाच्या तयारीच्या बातम्याही समोर येत आहेत. कपूर कुटुंबीयांशी निगडीत सूत्रांच्या माहितीनुसार, रणधीर कपूर आणि करिना कपूर यांनाही करिश्मानं जुन्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला नव्यानं सुरुवात करावी, असं वाटतंय. 

यानंतर करिश्मा आणि संदीपच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हा विवाह आयोजित करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. 

उल्लेखनीय म्हणजे, संदीपही आपल्या पहिल्या पत्नीपासून वेगळा झालाय. करिश्माला आपल्या लग्नाचा गाजावाजा न करता साध्या पद्धतीनं लग्न करायचंय, असंही म्हटलं जातंय. 

दिल्लीस्थित संजय कपूरशी घटस्फोट घेण्याच्या काही वर्षांच्या आधीपासूनच करिश्मा आपल्या मुलांसोबत मुंबईत राहतेय... त्यानंतर कपूर खानदानाच्या अनेक पार्ट्यांत करिश्मासोबत संदीप तोषनीवाल यानं लावलेली हजेरी बरच काही सांगून जात होती... करिश्मा पुन्हा एकदा लग्न करत असेल तर आपल्याला आनंदच होईल, असं म्हणत रणधीर कपूर यांनीही करिश्माला शुभेच्छाच दिल्या होत्या.