मुंबई : प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस असतो तो म्हणजे लग्न. त्यानंतर पतीसोबत नव्या आयुष्याची सुरूवात. लग्न आणि लग्नापुर्वी आणि नंतरचे काही क्षण कोणतीही स्त्री विसरू शकत नाही. सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे आपण ते क्षण सर्वांसोबत शेअर करू शकतो. अभिनेत्री करिश्मा तन्नाचं नुकताचं लग्न झालं. करिश्माचे बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत नव्या जीवन प्रवासाला सुरूवात केली आहे.
करिश्माने पती वरुण बंगेरासोबत नव्या घरात गहप्रवेश केला. तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . व्हिडीओमध्ये करिश्मा फार आनंदी दिसत आहे.
वरुण बंगेरासोबत लग्न करण्याआधी करिश्मा उपेन पटेलला डेट केले आहे. दोघेही 'बिग बॉस हाऊस'मध्ये भेटले होते. दोघांनी 'लव्ह स्कूल' हा रिअॅलिटी शोही होस्ट केला आहे. करिश्मा तन्ना आणि पर्ल वी पुरी एकमेकांना डेट करत होते. नंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघे चांगले मित्र आहेत.