मुंबई : अंकिता लोखंडेनंतर आता लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना हिनेही लग्नाची तयारी सुरू केली आहे. करिश्मा तन्ना हिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. लवकरच अभिनेत्री करिश्मा तन्ना बॉयफ्रेंड वरुण बंगेरा सोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा तन्ना प्री-वेडिंग सेरेमनी हळदी, मेहंदी आणि संगीत 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जात आहे की, करिश्मा आणि वरुण 6 फेब्रुवारी रोजी इंडस्ट्रीतील मित्र आणि जवळच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करतील. करिश्मा तन्ना बॉयफ्रेंड वरुण याचा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही.
करिश्मा तन्नाचा पती वरुण बंगेरा हा मुंबईतील रिअल इस्टेट व्यावसायिक आहे. 12 नोव्हेंबरला या कपलची एंगेजमेंट झाली. करिश्मा आणि वरुणच्या एंगेजमेंटला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. करिश्मा आणि वरुण बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माने तिच्या लग्नाबद्दल मौन पाळलं आहे कारण तिला तिचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धी झोतात येऊ द्यायचे नाही आहे. करिश्माच्या लग्नात फक्त कुटुंब आणि मित्र उपस्थित राहाणार आहेत.