करिश्मा कपूरच्या लग्नाबाबत वडिलांचा मोठा खुलासा

२०१६ मध्ये करिश्माने घेतला घटस्फोट

करिश्मा कपूरच्या लग्नाबाबत वडिलांचा मोठा खुलासा

मुंबई : संजय कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा कपूर अनेकदा बॉयफ्रेंड संदीप तोषनीवालसोबत दिसली आहे. २०१६ मध्ये करिश्माने संजय कपूरला घटस्फोट दिला. यानंतर ती एकटीच आपल्या दोन मुलांना समायरा आणि कियानला सांभाळत आहे. मध्येच करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबद्दल देखील चर्चा केली जाते. 

करिश्मा अनेकदा बॉयफ्रेंड संदीपसोबत दिसली त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे. आता असं म्हटलं जातंय की, करिश्मा आणि संदीप ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करू शकतील. एवढंच काय तर आता करिश्माचे वडिल ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांनी देखील लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. 

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही. मला मनापासून वाटतंय की करिश्माने दुसरं लग्न करावं पण सध्या ती त्यासाठी तयार नाही. आम्ही तिच्याशी या विषयावर बोललो पण सध्या ती या सगळ्याचा विचार करत नाही. करिश्मा सध्या आपल्या मुलांकडे लक्ष देत आहे. मात्र सध्या ती फॅमिलीबाबत कोणतंही प्लानिंग करण्यास तयार नाही. रणधीर पुढे म्हणतात, माझ्या मुलीने लग्नानंतर जे भोगलं आहे ते खरंच खूप धक्कादायक आहे. संदीपबाबत रणधीर म्हणाले की, मी अद्याप संदीपला ओळखत नाही. करिश्मा एक सिंगल वुमन आहे. तिला जर कुणासोबत जावंस वाटत आहे तर ती जाऊ शकते. यामध्ये काहीच चुकीचं नाही.