जब वी मेट 2 मध्ये या अभिनेत्रीने घेतली करीना कपूरची जागा!! पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा 'जब वी मेट' हा चित्रपट आजही सर्वांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.

Updated: Oct 19, 2021, 10:50 PM IST
जब वी मेट 2 मध्ये या अभिनेत्रीने घेतली करीना कपूरची जागा!! पाहा व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा 'जब वी मेट' हा चित्रपट आजही सर्वांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची गाणी आणि  डायलॉग अजूनही लोकांच्या जिभेवर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'जब वी मेट' चित्रपटाचा दुसरा भाग बनवला जाणार आहे. करीना कपूर खानची मोठी बहीण करिश्मा कपूर या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. खुद्द करिश्मा कपूरनेच ही माहिती दिली आहे. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात करिश्मा तिच्या बहिणीशी फोनवर बोलताना दिसत आहे.

करिश्मा कपूर व्हिडिओमध्ये तिच्या ड्रेसिंग टेबलवर बसलेली दिसत आहे आणि करीना कपूरला फोनवर असं म्हणताना दिसत आहे की, 'करीना तुला विश्वास बसणार नाही की मी जब वी मेटची फसवणूक करणार आहे'. करीना तुला विश्वास बसणार नाही की, मी जब वी मेट सिनेमाची फसवणूक करायला जातेय. एड करत आहे की, आजकल 90's एवढं थ्रोबॅक झालं आहे की, मला प्रेजेंटची आठवण येत आहे.'' फोनवर बोलत असताना, करिश्मा मागे वळून बघते,' आणि म्हणते, ''तू हे रेकॉर्ड करत आहेस का''?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जरी तो प्रमोशनचा भाग असला तरी,  व्हिडिओमध्ये करिश्मा कपूरने जब वी मेट चित्रपटात करीनाने साकारलेल्या पात्राच्या गाण्याचा गेटअप कॅरी केला आहे. तसेच, ती स्वतःला आरशात पाहताना दिसतेय. करिश्मा कपूरने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. करिश्माचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडत आहे आणि चाहते कमेंट बॉक्समध्ये खूप कमेंट करताना दिसत आहेत.