'ससुर मेरे प्यारे' म्हणत हरियाणवी डान्सर आर सी उपाध्यायने लगावले ठुमके, पाहा व्हिडिओ

हरियाणवी डान्सर आर सी उपाध्याय आपल्या अदांनी अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Updated: Oct 19, 2021, 10:40 PM IST
'ससुर मेरे प्यारे' म्हणत हरियाणवी डान्सर आर सी उपाध्यायने लगावले ठुमके, पाहा व्हिडिओ

मुंबई : हरियाणवी डान्सर आर सी उपाध्याय आपल्या अदांनी अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण यावेळी स्वतः आर.सी. उपाध्यायच्या हृदयाचे ठोके तिच्या सासऱ्यांनी वाढवले ​​आहेत. खरंतर आम्ही तिच्या व्हायरल डान्स व्हिडिओबद्दल बोलत आहोत ज्यात आर सी उपाध्याय स्टेजवर बोल्ड डान्स मूव्ह करताना दिसत आहे.

बोल्ड इशाऱ्यांमध्ये केलं फँन्सना घायाळ
व्हिडिओमध्ये आर सी उपाध्याय प्रेक्षकांसमोर 'सासुर मेरे प्यारे' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. आर सी उपाध्याय या व्हिडिओमध्ये खूप बोल्ड आणि रोमँटिक एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिला पाहून त्या ठिकाणी बसलेले लोक उत्साही झालेले दिसतात. आरसीचा हा बोल्ड डान्स व्हिडिओ इंटरनेटवर आग लावत आहे.

'ससूर मेरे प्यारे' गाण्यावर थिरकली डान्सर
हरियाणा आणि त्याच्या बाजूच्या भागात हरियाणवी नृत्याला खूप मागणी आहे. आर.सी. उपाध्याय आणि तिच्यासारखे अनेक डान्सरक गावं आणि शहरांमध्ये असे डान्स शो करतात. एकेकाळी सपना चौधरी देखील अशीच स्टेजवर डान्स करायची, पण कालांतराने तिची फॅन फॉलोइंग इतकी वाढली की तिला बिग बॉसमध्ये संधी मिळाली.

सपना चौधरी बराच काळ बिग बॉसच्या घरात राहिली आणि नंतर जेव्हा ती घरातून बाहेर पडली तेव्हा तिला बाहेर येताच तिला अनेक प्रोजेक्ट मिळाले. सपना चौधरीने अनेक म्युझिक व्हिडिओ केले आणि तिला चित्रपटांमध्ये कामही मिळाली. सपना चौधरी प्रमाणे, आर.सी. उपाध्यायचं देखील फॅन फॉलोईंग खूप वेगाने वाढत आहे. आता हे पाहणे बाकी आहे की ती स्टेज ते टीव्ही आणि नंतर टीव्ही ते चित्रपटांपर्यंत प्रवास करेल का?