कार्तिक आर्यनकडून प्रेमाची कबुली, फोटो शेअर करत म्हणाला, 'मी पुन्हा एकदा...'

हा फोटो शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले की, 'पुन्हा एकदा प्रेमात पडलो.'

Updated: Feb 2, 2022, 08:22 PM IST
कार्तिक आर्यनकडून प्रेमाची कबुली, फोटो शेअर करत म्हणाला, 'मी पुन्हा एकदा...' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने काही वेळातच इंडस्ट्रीत चांगली ओळख निर्माण केली आहे. कार्तिक आर्यनला बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट चित्रपट दिले जात आहेत. त्याने ज्या प्रकारे कमी कालावधीत यश मिळवलं आहे. ते कौतुकास्पद आहे. इतर कलाकारांप्रमाणे कार्तिक आर्यन ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. आता देखील त्याने त्याच्या जवळच्या जवळच्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्य झाला.

हा फोटो शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले की, 'पुन्हा एकदा प्रेमात पडलो.' आता तुम्हाला हे वाचून प्रश्न पडला असेल की अशी कोणती व्यक्ती किंवा अभिनेत्री आहे, जिच्या प्रेमात कार्तिक पडला आहे? ज्याची कबुली त्याने सोशल मीडियावर दिली. परंतु तसे काही नाही.

कार्तिक आर्यनने त्याच्या घराती छोट्या पाहूण्याचा फोटो शेअर केला आहे. ज्याच्या तो प्रेमात पडला आहे.
 
कार्तिक आर्यनने एक पांढऱ्या रंगाचा कुत्रा घेतला आहे. त्याचं नाव त्याने कटोरी ठेवलं आहे. फोटोसोबत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "कटोरी, मी पुन्हा प्रेमात पडलो आहे" ऐवढेच काय तर कार्तिकने katoriaaryan नावाने त्याच्या कुत्र्याचे इंस्टाग्राम अकाऊंट देखील बनवलं आहे. ज्यावर त्याने या कुत्र्याचे दोन फोटो ठेवले आहे.

म्हणजेच आता तुम्हाल या नवीन अकाउंटवरती कार्तिकच्या कुत्र्याबद्दल माहिती मिळेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कार्तिक आर्यनबद्दल माहिती

2021 हे वर्ष कार्तिक आर्यनसाठी खूप चांगले ठरले. कार्तिक आर्यनने 'धमाका' चित्रपटातून मनोरंजन विश्वात धुमाकूळ घातला आहे. कार्तिकचे हे वर्षही गेल्या वर्षीच्या तुलनेत जबरदस्त ठरणार आहे. यावर्षी अभिनेत्याचे 'शहजादा', 'भूल भुलैया 2',  आणि 'कॅप्टन इंडिया' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सर्वांशिवाय तो साजिद नाडियादवालासोबत एक चित्रपटही करणार आहे, ज्याचे नाव अद्याप समोर आलेलं नाही.