सारा नाही तर 'या' अभिनेत्रीला करतोय कार्तिक आर्यन डेट? रेस्टारंट बाहेर दिसले एकमेकांच्या मिठीत

 हँडसम हंक कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील सर्वात तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे. तो बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. उत्कृष्ट चित्रपटांद्वारे त्याने स्वतःला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यापैकी एक बनवलं आहे.

Updated: Oct 22, 2023, 11:41 AM IST
सारा नाही तर 'या' अभिनेत्रीला करतोय कार्तिक आर्यन डेट? रेस्टारंट बाहेर दिसले एकमेकांच्या मिठीत title=

मुंबई : हँडसम हंक कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील सर्वात तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे. तो बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. उत्कृष्ट चित्रपटांद्वारे त्याने स्वतःला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यापैकी एक बनवलं आहे. कायमच तो त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता कार्तिक पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच तो एका अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला आहे. ज्यामुळे त्याच्या डेटिंगबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

याआधी अभिनेत्याचं नाव अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं जात होतं. मात्र या चर्चा दरम्यान अभिनेता एका अभिनेत्रीसोबत डिनर डेटला गेल्याचं दिसलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडिओत दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तारा सुतारिया आहे. नुकताच कार्तिक तारासोबत स्पॉट झाला आहे. चला तर मग बघूयात नेमकं काय आहे हे प्रकरण.

नुकताच कार्तिक आर्यन मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये तारा सुतारियासोबत दिसला. हे जोडी डिनर डेट गेल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना मात्र जबर आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या दोघांनी कधीही कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. मात्र ही जोडी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया शनिवारी रात्री डिनर डेटनंतर एकत्र दिसले. अभिनेता आणि  अभिनेत्री एकत्र रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले आणि तारा तिच्या कारमध्ये जाण्यापूर्वी कार्तिकला मिठी मारली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याच रात्री कार्तिक आर्यन तारा तिला तिच्या कारपर्यंत सोडतो आणि तो त्याच्या गाडीमध्ये जावून बसतो. पापाराझींनी त्यांचे फोटो काढू नयेत यासाठी दोघांनीही प्रयत्न केले. व्हिडिओमध्ये, कार्तिक आर्यन पांढर्‍या शर्टमध्ये सुंदर दिसत आहे, ज्यासोबत त्याने काळी पँट आणि  शूज घातले आहेत. तर दुसरीकडे, तारा सुतारिया ब्लॅक क्रॉप टॉप, अॅनिमल प्रिंटेड स्कर्ट आणि स्नीकर्समध्ये स्टायलिश दिसतेय. फ्री हेअरस्टाइल आणि हँडबॅगने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.या दोघांना असं एकत्र पाहून नक्की दोघांमध्ये काय चाललं असेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण या दोघांना एकत्र पाहून  हे दोघे एका चित्रपटासाठी भेटत आहेत की डेट करत आहेत हे येत्या काही दिवसांत आपल्याला समजेल.