कतरिना कैफच्या भावाला डेट करतेय बॉलीवुडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिचा नवरा विकी कौशल आणि मित्रांसोबत मालदीवमध्ये तिच्या वाढदिवसाच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. 

Updated: Jul 18, 2022, 08:22 PM IST
कतरिना कैफच्या भावाला डेट करतेय बॉलीवुडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिचा नवरा विकी कौशल आणि मित्रांसोबत मालदीवमध्ये तिच्या वाढदिवसाच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. कतरिनाच्या 39 व्या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक  फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हेकेशनचे फोटो समोर येताच कतरिना कैफच्या भावाच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंतर, सुट्टीतील असे काही फोटो समोर आले आहेत. ज्यानंतर सेबॅस्टियनचं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचं नातं चर्चेत आलं आहे.

इस एक्ट्रेस को डेट कर रहे हैं सैबेस्टियन
प्रत्येकजण या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून इलियाना डिक्रूझ आहे. ती बॉलीवूडच्या सर्वात हॉट हिरोईनपैकी एक आहे. आजकाल इलियाना तिच्या वाढदिवसाला कतरिनासोबत मालदीवमध्ये आहे. यासोबतच कतरिनाचा भाऊ सेबॅस्टिनचाही या ग्रुपमध्ये समावेश आहे. सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये इलियाना आणि सेबॅस्टिन दोघंही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इलियानाने शेअर केले आहेत फोटो 
इलियानाने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोंसमोर इलियाना आणि सेबॅस्टियनच्या नात्याची चर्चा रंगली आहे. बर्फी, रुस्तम आणि मैं तेरा हिरो फेम अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवताना दिसत आहे.