अभिनेत्री कतरिना कैफकडून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

अभिनेत्रीने इन्स्टाद्वारे आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे

Updated: Mar 31, 2022, 08:56 PM IST
अभिनेत्री कतरिना कैफकडून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर देखील शेअर केली आहे. एकीकडे कतरिना कैफ आपल्या अभिनयामुळे लोकांच्या मनात घर करून आहे. तर लग्नानंतरही ती खूप चर्चेत आहे.

आता या अभिनेत्रीला एक मोठा पुरस्कार मिळाला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. खरंतर, अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या तिच्या कॉस्मेटिक ब्रँडद्वारे उद्योजक बनलेल्या कतरिना कैफला ब्युटी एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

आजच्या काळात अनेक बॉलीवूड स्टार्सही आपला व्यवसाय करत आहेत आणि त्यातून चांगले पैसे कमावत आहेत. या यादीत बॉलीवूडची स्टायलिश अभिनेत्री कतरिना कैफच्या नावाचाही समावेश आहे, जिने 2019 मध्ये स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँड लॉन्च केला. हा ब्रँड केवळ बॉलीवूड स्टार्सनाच आवडत नाही तर लोकांनाही खूप आवडतो. यासोबतच, अभिनेत्रीने हा पुरस्कार तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला, जिने तिचं अभिनंदनही केलं.

कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री आहे आणि तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या अभिनय प्रवासात आतापर्यंत 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आजच्या काळात तिचा समावेश सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये होतो. कतरिना लवकरच अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे पण सध्या ती टायगर 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.