KBC 16 Amitabh Bachchan : या महिन्याच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती 16' सुरु झाला आहे. त्यातही कोणत्याही स्पर्धकाला यश मिळालेलं नाही. शोमध्ये काही स्पर्धकांना जॅकपॉट लागतो तर काही स्पर्धक हे सुरुवातीलाच खेळातून बाहेर होतात. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांना एका स्पर्धकाच्या गंभीर आजारा विषयी कळलं. राजस्थानच्या राहणाऱ्या या स्पर्धकाच्या मदतीला अमिताभ हे धावून आले आहेत.
27 वर्षांच्या नरेशी मीना ही राजस्थानच्या सवाई माधोपुरची राहणारी आहे. तिनं बिग बींना सांगितलं की तिला 2018 मध्ये ब्रेन ट्यूमर निदान झाले आणि 2019 मध्ये तिची एक सर्जरी झाली. खरंतर तिचा हा जो ट्यूमर आहे तो अशा ठिकाणी आहे जिथून काढता येणं खूप कठीण आहे. तर दुसरीकडे तिच्या आईनं तिच्या ऑपरेशनसाठी सगळे दागिने विकले. आता उपचार करण्यासाठी लागणारी रक्कम मिळवण्यासाठी नरेशी ही या शोमध्ये आली आहे. नरेशीनं यावेळी हे देखील सांगितलं की तिला प्रोटॉन थेरेपी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही सगळ्यात महागडी ट्रिटमेंट आहे. ही ट्रिटमेंट करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये लागतात.
नरेशीनं तिच्या आजारीविषयी सांगितल्यानंतर अमिताभ बच्चन भावूक झाले. बिग बीनं प्रोटॉन थेरेपीसाठी लागणारा सगळा खर्च करण्याचं प्रयत्न करणार असल्याचं वचन तिला दिलं. त्यांनी सांगितलं की 'मला तुझा सहाय्यक व्हायचे आहे, मला तुला पाठिंबा द्यायचा आहे आणि आता तू शोमधून जी काही रक्कम जिंकशील ती तुझी असेल. तुमच्या उपचाराबाबत काहीही चिंता करु नकोस.'
अमिताभ बच्चन यांनी नरेशीच्या साहसीवृत्तीचे कौतुक केले आणि म्हणाले, 'सार्वजनिक ठिकाणी अशा कोणत्याही गोष्टीवर बोलण्यासाठी महिलेत खूप हिंम्मत असावी लागते. तू जे धैर्य दाखवलंस त्यासाठी मी आभारी आहे. मी तुझ्या या संपूर्ण हिंम्मतीची दाद देतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की तुला या गोष्टीची चिंता असेल की तू किती रक्कम जिंकणार आणि त्याशिवाय तू उपचाराला घेऊन खूप सकारात्मक आहे. आता पैशांविषयी चिंता करु नका.'
हेही वाचा : घटस्फोटानंतर अर्जुन कपूरसोबत अफेअरच्या चर्चा; आता डेटिंग अॅपच्या भरवश्यावर कुशा कपिला!
नरेशी विषयी बोलायचे झाले तर ती हॉट सीटवर असताना तिनं 3.2 लाख रुपये जिंकले. तर या शोमध्ये ती 1 कोटींच्या प्रश्नांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले.