भावाच्या आत्महत्येनंतर अखेर केतकी माटेगावकर व्यक्त; भावनिक पोस्टनं वळवल्या नजरा

केतकीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Updated: Jul 28, 2022, 12:20 PM IST
भावाच्या आत्महत्येनंतर अखेर केतकी माटेगावकर व्यक्त; भावनिक पोस्टनं वळवल्या नजरा  title=

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातील सुसगावमध्ये इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या दुर्देवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्राजक्ता आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. प्राजक्ताच्या या चुलत भावाचं ना अक्षय अमोल माटेगावकर होतं. तो २१ वर्षांचा होता. अजूनही त्याचं कुटुंब या घटनेतून सावरलेलं नाही. आता या अपघाताच्या १५ दिवसानंतर केतकीनं सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

केतकीनं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षयसोबतचा फोटो आणि व्हिडीओ केतकीनं शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत केतकी म्हणाली, 'माझा अक्षु माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्या सारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, मल्टी टॅलेंटेड, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, लिहू की नको लिहू, 21 वर्षांच्या आठवणी काही शब्दात कशा लिहू? हाच विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत होत आहे. ते क्षण धुसर होता कामा नये. किती आणि केवढ्या आठवणी...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे केतकी म्हणाली, 'अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेऊन रियाझला बसुन त्यात हरवून जाणारा अक्षु, गझल ठुमरी ऐकत बसणारा, कधी हरिहरन तर कढी पिंक फ्लॉइड ऐकनारा. कधी भारतीय शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉल मधला तपशीलवार ज्ञान असलेला, घरी आल्यावर तू मी अमोल चाचा बसलो की जॅमिंग करणारा माझा अक्षु मला सोडुन गेला.'

पुढे अक्षयच्या आठवणी शेअर करत केतकी म्हणाली, 'अक्षु तुझा समजुरदारपणा, तुझी बुद्धिमत्ता अतुलनीय होती. तरी एक गोष्ट तुझी केतकी ताई म्हणून - आयुष्यात कुठली ही गोष्ट, ध्येय, स्वप्न, विचार आपल्या स्वत: पेक्षा मोठे नसतात, ते होऊ द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणून त्यांचं अस्तित्व असतं. तू आम्हांला सोडुन गेलास पण आयुष्यभर एक गोष्ट तू आमच्या सोबत आहेस ह्याची जाणीव करुन देत राहिल.. ते म्हणजे तुझं गाणं! तुझं अप्रतिम गाणं. घरी आले की तुझं गोड हसून मिठी मारणं, कधीही तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि चित्रपट किंवा मॅच चालु असेल तरी तुझं प्रेमाने डोक्यावरुन हात फिरवणं मिस करतेय मी. आसं वाटते की आत्ता आले घरी की अमोल चाचा हार्मोनियम घेईल, तू तानपुरा लावशील आणि आपण गायला बसू. सगळं पूर्ववत.. रोज सकळी उठले की क्षणभर असं वाटून जातं आणि मग लगेच परिस्थिती मला वास्तवाचं भान करुन देते.'

पुढे केतकी म्हणाली, 'तुझा लहानपणीचा “रूठ के हमसे कभी” ते एक अप्रतिम ख्याल गायकी! हा प्रवास मी पाहिलाय खूप खूप जवळून.. माझा लहान भाऊ एक अप्रतिम कलाकार होता, याचा मला कायम अभिमान वाटत राहील. मी हे वाक्य तुझ्यासाठी लिहेन असं वाटलं नव्हतं कधी पण.. तू जिथे कुठे असशील, अशी कल्पना करतेय की तू गात असशील, आनंदी असशील, तू कायम आमच्या मिठीत, आमच्यासोबत राहशील. आपण 5 कायम एकत्र असू. तू, आकांक्षा अम्मू, चाय आणि मी. माझं प्रेम कायम तुझ्यासोबत राहील. मिस यू अक्षु. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. -केतकीताई.' अशा शब्दात केतकीने आपले दुःख व्यक्त केलं आहे.