KGF 2 OTT Release: थिएटरनंतर आता या OTT वर रिलीज होणार सिनेमा, जाणून घ्या तारीख

यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Updated: Apr 22, 2022, 02:16 PM IST
KGF 2 OTT Release:  थिएटरनंतर आता या OTT वर रिलीज होणार सिनेमा, जाणून घ्या तारीख title=

KGF 2 OTT Release Date : सुपरस्टार यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' (KGF Chapter 2) दररोज एक नवा इतिहास रचत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये सिनेमा चांगली कामगिरी करत आहे. परंतु जर तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर जरा थांबा. कारण हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

KGF 2 कोणत्या OTT वर रिलीज होणार?

News18 च्या रिपोर्टनुसार, 'KGF Chapter 2' चे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime ने विकत घेतले आहेत. यशचा हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये Amazon Prime Video वर स्ट्रीम केला जाईल. तुम्ही घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकाल.

या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार

दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित 'KGF Chapter 2' (KGF Chapter 2 Release Date On OTT), 27 मे पासून Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ओटीटी रिलीजबाबत अधिकृत विधान जारी केलेले नाही. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला

'KGF Chapter 2' ने रिलीजच्या सातव्या दिवशी हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. गुरुवारी चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली 2' चित्रपटाचा विक्रमही मोडला, ज्याने रिलीजच्या पहिल्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर 246 कोटी रुपयांची कमाई केली. 'KGF 2' ने रिलीजच्या सातव्या दिवशी 250 कोटींच्या कलेक्शनसह 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला आहे.

'KGF Chapter 2' चित्रपटाची कथा मुंबईत वाढलेल्या एका तरुणाची आहे, जो अंडरवर्ल्डमध्ये घुसल्यानंतर सोन्याच्या खाणी काबीज करण्यासाठी निघतो. चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्स आणि संवादांची खूप प्रशंसा केली जात आहे. यश, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, प्रकाश राज आणि संजय दत्त या कलाकारांनी या चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे.