मराठमोळं सेलिब्रिटी कपल दुसऱ्यांदा झाले पालक, गोंडस लेकीला दिला जन्म

Good News : खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले बाबा... 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 3, 2024, 03:08 PM IST
मराठमोळं सेलिब्रिटी कपल दुसऱ्यांदा झाले पालक, गोंडस लेकीला दिला जन्म

मराठी टीव्ही मालिकांमध्ये कायमच चर्चेत असलेली नावे म्हणजे खुशबू तावडे आणि संग्राम साळवी. हे दोघे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. खुशबूने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

संग्राम साळवी आणि खुशबू तावडे हे दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. खुशबूने 2 ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला आहे. खुशबू आणि संग्राम .यांना आधी एक मुलगा आहे. 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत खुशबू तावडे प्रमुख भूमिकेत होती. 

2018 साली अभिनेता संग्राम साळवी आणि खुशबू तावडेने लग्न केलं. 2 नोव्हेंबर 2011 रोजी पहिल्यांदा पालक झाले. एका मुलाला खुशबूने जन्म दिला होता. या मुलाचं नाव राघव असे ठेवले. राघव आता 3 वर्षांचा असून घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. 

खुशबूने काही दिवसांपूर्वी ही गोड बातमी शेअर केली होती. खुशबू 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत आईच्या भूमिकेत होती.खुशबूने ही मालिका सोडून घरी थांबण्याचा निर्णय घेतला. खुशबूची बहीण आणि अभिनेत्री तितिक्षा तावडेने डोहाळे जेवणाचा व्हिडीओ तिच्या युट्यूब अकाऊंटवर शेअर केला होता.

अभिनेत्री वैशाली भोसलेने मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. यानंतर सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. महत्त्वाचं म्हणजे खुशबू आणि संग्राम यांच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाची तारीख ही 2 आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More