'शेरशाह' फेम सिद्धार्थच्या घरातून रात्री उशिरा बाहेर पडलेली 'ती' कोण?

ड्रेसवर ओढणी गुंडाळल्या अवस्थेत कॅमेऱ्यात कैद  

Updated: Dec 22, 2021, 11:19 AM IST
'शेरशाह' फेम सिद्धार्थच्या घरातून रात्री उशिरा बाहेर पडलेली 'ती' कोण?  title=

मुंबई : प्रसिद्ध सेलिब्रीटींवर कायम चाहते आणि फोटोग्राफर्सच्या नजरा असतात. स्टार कोणत्या ठिकाणी आहेत? काय करत आहे? एवढंच नाही तर सेलिब्रीटींच्या घराबाहेर देखील चाहते आणि फोटोग्राफर्सची एकच गर्दी जमलेली असते. आता सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे 'शेरशाह' फेम सिद्धार्थ मल्होत्राच्या घरातून रात्री उशिरा बाहेर पडलेल्या त्या व्यक्तीबद्दल.

सिद्धार्थच्या घरातून मध्यरात्री बाहेर पडलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कियारा आडवाणी आहे. मध्यरात्री कियारा, सिद्धार्थच्या घरातून बाहेर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये नक्की नातं काय आहे? हे समोर येत आहे. सध्या त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. पण दोघांनी नात्याबद्दल काहीही सांगितले नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'शेरशाह' सिनेमाच्या माध्यमातून दोघांमधील केमेस्ट्री प्रेक्षकांसमोर आली. चाहत्यांनी देखील या जोडीला डोक्यावर घेतलं. सिनेमानंतर कियारा आणि सिद्धार्थ कधी लग्न करणार असा प्रश्न सतत चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून ती एकापेक्षा एक सिनेमांमध्ये भूमिका साकारताना दिसली. आता कियारा 'भूल भुलैया 2', 'जुग जुग जियो', 'गोविंदा नाम मेरा' आणि 'RC 15' सिनेमांच्या माध्यमातून पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.