वाचली रे... कियारावरचं मोठं संकट टळलं... कसं ते पाहा...

बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Updated: May 2, 2022, 04:48 PM IST
वाचली रे... कियारावरचं मोठं संकट टळलं... कसं ते पाहा... title=

मुंबई : बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कार्तिक आपल्या हुशारीने कियाराला ओप्स मोमेंटचा बळी होण्यापासून वाचवताना दिसत आहे.

शॉर्ट ड्रेसमुळे कियारा नाराज
'भूल भुलैया 2'च्या प्रमोशनदरम्यान कियारा अडवाणीचा शॉर्ट ड्रेस लूक सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. या शॉर्ट ड्रेसने यावेळी कियाराला थोडा त्रास दिला. मात्र, येथील परिस्थिती कार्तिक आर्यनने हाताळली. आता कार्तिक आणि कियाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कार्तिक कियाराचा लूक
हा व्हिडिओ 'भूल भुलैया 2' च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचा आहे. यादरम्यान कियाराने लाल रंगाचा सुंदर शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने ऑरेंज कलरचं जॅकेट घातलं होतं तर कार्तिक आर्यन ब्राऊन कलरचे जॅकेट आणि पॅन्टमध्ये दिसला.