कोणी अभिनेता नाही, 'ही' व्यक्ती आहे किआराची क्रश

किआरा आडवाणीच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे.

Updated: Dec 14, 2019, 01:50 PM IST
कोणी अभिनेता नाही, 'ही' व्यक्ती आहे किआराची क्रश

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किआरा आडवाणीच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे. ती तिच्या आगामी 'गुडन्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर, किआरा अडवाणी अभिनेता अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात करिना आणि अक्षय पती-पत्नीच्या भूमिकेत तर कियारा आणि दिलजीत देखील पती-पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

येत्या २७ डिसेंबर रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत किआराने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने तिच्या गर्लक्रशचे नाव जाहीर केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Full house for promotions today

तर अभिनेत्री करिना कपूर तिची गर्ल क्रश असल्याचे तिने सांगितले आहे. शिवाय करिनामुळेच तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला आहे. ''कभी खुशी कभी गम'मधील पू.. असो किंवा 'जब वी मेट' हा चित्रपट असो मला तिच्या अदा, नृत्य, अभिनय फार आवडायचं. ती फक्त तिचीच फेव्हरेट नसून सर्वांची फेव्हरेट आसल्याचं किआरा म्हणाली आहे. 

'गुडन्यूज' चित्रपटापूर्वी किआरा 'कबीर सिंग'च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. 'कबीर सिंग' चित्रपटातील तिच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच दाद दिली होती. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहीद कपूरने स्क्रिन शेअर केली होती. 

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटानंतर कियारा आणि शाहीदच्या करियरला देखील उत्तम कलाटनी मिळाली आहे. आता 'गुडन्युज' चित्रपट किआराला किती प्रसिद्धी मिळवून देतो हे पाहाणं मजेशीर ठरणार आहे.