रणबीर आणि आलियाच्या घराबाहेर आले भलतेच पाहुणे....आणि चक्क करतायत पैशांची मागणी...

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा विवाहसोहळा संपन्न झालाय मात्र लग्नाच्या दोन दिवसांनंतर रणबीरच्या वास्तू या बंगल्याबाहेर आता नवे पाहुणे आले आहेत आणि ते रणबीरकडे चक्क पैशांची मागणी करतायत

Updated: Apr 16, 2022, 04:00 PM IST
रणबीर आणि आलियाच्या घराबाहेर आले भलतेच पाहुणे....आणि चक्क करतायत पैशांची मागणी... title=

मुंबई-  रणबीर आणि आलियाच्या लग्नाला 2 दिवस उलटून गेले तरी त्यांच्या लग्नाच्या गॉसिप काही थांबताना दिसत नाहीयत..त्यांच्या लग्नाला मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रण होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या लग्नाबाबत मोठी उत्सुकता आहे..

लग्नात कोण पाहुणे होते, लग्नात मेन्यू काय होता, इथपासून ते लग्नाचा माहोल संपेपर्यंत सगळ्याच  गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे....तर या लग्नाबाबत आणखी एक व्हिडीओ आता व्हायरल झालाय आणि तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीर आणि आलियाचा शाही विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित पार पडला...या लग्नाला दोन दिवस पूर्ण होत नाहीत तोच रणबीरच्या 'वास्तू' या बंगल्याबाहेर आता नवे पाहुणे आलेत. हे नवे पाहुणे रणबीरकडे चक्क पैशांची मागणी करतायत.

हे पाहुणे दुसरे-तिसरे कुणी नसून तृतीयपंथी आहेत...या नव्या जोडप्याला आशीर्वाद देऊन शगूनची रक्कम घेण्यासाठी ते 'वास्तू'बाहेर  जमा झाले..त्यांचा हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झालाय...

बंगल्याच्या गेटवर सिक्युरिटी असल्याने त्यांना आत जाता न आल्याने त्यांनी बाहेरून या नव्या जोडप्याला आशीर्वाद दिलाय. रणबीरकडून शगून घेण्याचा हे तृतीयपंथी पक्का बेत करून आले होते मात्र सिक्युरिटीने बंगल्यात न सोडल्याने त्यांचा हिरमोड झाला

पाली हिल परिसरातील वास्तू या बंगल्यात रणबीर-आलियाचा शाहीविवाह सोहळा 14 एप्रिलला पार पडला..सोशल मीडियावर सध्या याच लग्नाची जोरदार चर्चा आहे. रोज नवनवे फोटो समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली.

या लग्नाला करिना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, करण जोहरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली