'या' व्यक्तीने सर्वांसमोर सलमान खानला म्हटलं, I Love You; व्हिडिओ व्हायरल

सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सलमान सोशल मीडियावरही नेमही सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियवर नेहमी पोस्ट शेअर करत असतो. अभिनेत्याच्या नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Updated: Apr 26, 2023, 02:14 PM IST
'या' व्यक्तीने सर्वांसमोर सलमान खानला म्हटलं, I Love You; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई :  अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्य 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामुळ सतत चर्चेत आहे. चाहत्यांकडून अभिनेत्याच्या या सिनेमाला खूप प संती मिळत आहे. सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सलमान सोशल मीडियावरही नेमही सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियवर नेहमी पोस्ट शेअर करत असतो. अभिनेत्याच्या नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

खरंतर अभिनेत्याचा हा व्हिडिओ सलमानच्या एका फॅनचा आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ दुबईमधला आहे. या व्हिडिओत सलमान त्याच्या चाहत्यांसोबत बोलताना दिसत आहे. अभिनेत्याचा चाहाता या व्हिडिओत त्याला  I Love You म्हणतो. यानंतर सलमान जे त्याला म्हणतो. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सलमान खानचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ दुबईमधला आहे. तो त्याच्या चाहत्यांशी बातचित करताना दिसत आहे. त्याचा चाहता मोठ्याने त्याला 'सलमान I Love You' असं म्हणतो. त्याचे हे शब्द ऐकून अभिनेता हसू लागतो. आणि म्हणतो, 'जेव्हा मुलगा आय लव्ह यु म्हणतो तेव्हा भिती वाटू लागते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानचे चाहते त्याला पाहून खूप एक्साइटेड दिसत आहे. सलमान स्टेजवर येताच त्याचे चाहते त्याला चिअरअप करताना दिसत आहेत. यावेळी सलमानने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली आहेत. त्याच्या चाहत्यांचा उत्साह पाहून सलमान खानदेखील खूप उत्साहित दिसत आहे. त्याचा एका चाहता म्हणतो की, 'तुमची पत्नी आहे ना... माझी नाहीये.' सलमानचं हे वक्तव्य ऐकून तिथे असलेले सगळेचं हसू लागले. सध्या सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

नुकताच सलमान खानचा  किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाकडून त्याच्या चाहत्यांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाहीये.  सध्या बॉलिवूडच्या सिनेमांना फारसं यश मिळत नाहीये. सलमानच्या या सिनेमाने चार दिवसांत 78.34 करोड इतकी कमाई केली आहे.