हॉटेलमध्ये भांडी धुवायचा हा अभिनेता

पाहा ही स्टोरी 

हॉटेलमध्ये भांडी धुवायचा हा अभिनेता  title=

मुंबई : बॉलिवूड ते अगदी हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने मोहर उमटवणारे दिग्गज अभिनेते ओम पुरी यांचा 18 ऑक्टोबर 1950 रोजी जन्म झाला. आज त्यांचा 68 वा वाढदिवस. 6 जानेवारी 2017 रोजी त्यांच निधन हार्ट अटॅकने झालं. अंबालामध्ये जन्मलेल्या ओम पुरी यांच्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम करावं लागत असे. त्याने गरज भागत नसल्यामुळे कोळशामध्ये देखील काम करावं लागलं. 

पंजाबी कुटुंबात जन्मलेले ओम पुरी यांचे वडिल रेल्वे कर्मचारी काम करत होते. ज्यांना सिमेंट चोरीमुळे पोलीस ठाण्यात जावं लागलं होतं. यामुळे त्यांच कुटुंब बेघर झालं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. मोठा भाऊ वेद प्रकाश पुरी यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कुलीचं काम देखील केलं आहे. तसेच घरातील परिस्थिती बदलण्यासाठी ओम पुरी यांनी ढाब्यावर भांडी देखील घासली आहे. एवढंच नाही तर ओम पुरी आपल्या मोठ्या भावाच्या भावांसोबत जवळच्या रेल्वे ट्रॅकवरून कोळसा आणत असतं. 

The life and times of legendary actor Om Puri

ओम पुरी यांनी कामासोबतच शिक्षण देखील पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणासाठी ननिहाल गेले जिथे त्यांचे मामा तार चंद आणि ईशर दास यांच्याकडे राहिले. कॉलेज लाइफमध्ये त्यांचा परिचय पंजाबी थिएटरचे वडिल हरपाल तिवाना यांच्याशी झाली. त्यामुळे त्यांचा कल हा थिएटरकडे वळला आणि त्यांनी नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरूवात केली. 

तस्वीरों में महान नायक ओमपुरी का जीवन

यानंतर पंजाबमधून निघून ओमपुरी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्लीमध्ये अॅक्टिंगचे धडे घेतले. तेव्हा त्यांची ओळख नसीरूद्दीन शाह यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी ओम पुरी यांना पुण्याच्या फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. ओमपुरी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, एफटीआयआयमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक चांगल शर्ट देखील नव्हतं.