मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार 'चुलबुल पांडे'

सलमान खानचा चित्रपट दबंग आणि दबंग-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. 

Updated: Oct 26, 2017, 10:44 PM IST
मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार 'चुलबुल पांडे'

मुंबई : सलमान खानचा चित्रपट दबंग आणि दबंग-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. यानंतर आता दबंग-3ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दबंग चित्रपटाचा निर्माता अरबाज खाननं ही माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी २०१८मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

अरबाज खाननं त्याचा आगामी चित्रपट तेरा इंतजारच्या ट्रेलर लॉन्चवेळी दबंग-३ बद्दल घोषणा केली. चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. २०१८च्या मध्यावधी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल, असं अरबाज खान म्हणालाय.