'ओ अंतवा' गाण्यावर थिरकली सामंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार; पाहा व्हिडिओ

'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन मजेशीर खुलाशांसह परतला आहे. 

Updated: Jul 20, 2022, 05:47 PM IST
'ओ अंतवा' गाण्यावर थिरकली सामंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार; पाहा व्हिडिओ title=

मुंबई : 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन मजेशीर खुलाशांसह परतला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये, जिथे आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी त्यांची गुपितं उघड करून आणि मजा करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तर दुसऱ्या भागात बी-टाउन बेस्टी सारा अली खान. आणि जान्हवी कपूर यांनी धमाल-मस्ती केली.

दोन्ही भाग लोकांना खूप आवडले होते. पण तिसरा भाग आणखी जबरदस्त असणार आहे. कारण यात चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज स्टार्सची एन्ट्री होणार आहे. 'कॉफी विथ करण 7' च्या तिसऱ्या पर्वाचे पाहुणे आहेत दक्षिण इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि बॉलिवूडचा 'अक्की' म्हणजेच अक्षय कुमार. 

दोघंही त्यांच्या मजेदार विनोदाने शोमध्ये खूप मजा करतील आणि शोचा होस्ट करण जोहर त्यांचा क्लास घेतानाही दिसणार आहेत. शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अक्षय आणि सामंथा यांनी त्यांच्या किलर डान्सने शोला चार चाँद लावले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शोचा नवीन प्रोमो व्हिडिओ 'डिस्ने प्लस हॉटस्टार'च्या इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सामंथा तिच्या 'ओ अंतवा' गाण्यावर अक्षय कुमारसोबत सिग्नेचर स्टेप करताना  दिसत आहे. दोघांचा हा डान्सही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. लाल रंगाच्या टॉप आणि गुलाबी पॅंटमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसत आहे. तर अक्षय निळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अक्षय आणि सामंथाचा हा भाग 21 जुलै 2022 रोजी 'डिस्ने प्लस हॉटस्टार' वर दिसणार आहे.