चला डोकं लावा! कधी येतोय Kota Factory Season 3? रिलीज डेट जाणून घेण्यासाठी जीतू भैय्याचं सोडवा कोडं

kota factory season 3 release date : जितेंद्र कुमारची (Jitendra Kumar) नवीन सीरिज 'कोटा फॅक्टरी 3'ची रिलिज डेट जाहीर करण्यात आलीये. तुम्हाला तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोडं सोडवावं लागणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 31, 2024, 04:09 PM IST
चला डोकं लावा! कधी येतोय Kota Factory Season 3? रिलीज डेट जाणून घेण्यासाठी जीतू भैय्याचं सोडवा कोडं title=
kota factory season 3 release date

Kota Factory Season 3 : अभिनेता जितेंद्र कुमार याची 'पंचायत 3' सिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. अनेकांनी पंचायतच्या तिसऱ्या सिझनला देखील डोक्यावर घेतलंय. जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) साकारलेली सचिवजीच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. अशातच आता जितेंद्र कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. जितेंद्र कुमारची आणखी एक वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (kota factory season 3) येत आहे. 'पंचायत 3' ची चर्चा असतानाच जितेंद्र कुमारची नवीन सीरिज 'कोटा फॅक्टरी 3'ची रिलिज डेट (kota factory season 3 release date) जाहीर करण्यात आलीये. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. मात्र, या रिलीज डेटची माहिती तुम्हाला लगेच मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक कोडं सोडवावं लागणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर जितेंद्र कुमारची कोटी फॅक्ट्री सिरीजचे पहिले दोन पार्ट रिलीज करण्यात आले होते. अशातच आता नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आता कोटा फॅक्टरीच्या तिसऱ्या पार्टची घोषणा करण्यात आलीये. जितेंद्र कुमार म्हणजेच जितू भैय्याने एका व्हिडीओद्वारे याची घोषणा केली. मात्र, जितू भैय्याने तारीख थेट सांगितली नाही तर एक कोडं सोडवायला दिलंय. बघा तुम्हाला जमतंय का कोडं सोडवायला?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

जितेंद्र कुमारच्या या व्हिडिओवर चाहते खूप मजेदार कमेंट करत आहेत. काही चाहत्यांनी रिलीजच्या तारखेबाबत अंदाज वर्तवलेला खोटा ठरलाय तर काहींनी अंदाज एकदम अचूक ठरलाय. अखेर डोक्याला जास्त ताण नको म्हणून नेटफ्लिक्सने तारीख देखील जाहीर केली. कोटा फॅक्ट्रीचा सिझन 3 येत्या 20 जूनला रिलीज होणार आहे. आता जितू भैय्या मुलांना आयुष्याचे आणि शाळेचे धडे शिकवायला पुन्हा येणार असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोटा फॅक्टरीचा पहिला सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. या सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत, ज्यामध्ये राजस्थानमधील कोटा येथे शिकण्यासाठी आलेल्या वेगवेगळ्या शहरातील मुलांबद्दल दाखवण्यात आले आहे. तसेच मोठ्या संस्थेत अॅडमिशन घेण्यासाठी मुलांची धडपड आणि मेहनत यावर देखील भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिझन 3 ची प्रतिक्षा सर्वांना आहे.