OYO Rules : ट्रॅव्हल बुकिंग वेबसाइट OYO आपल्या कपल फ्रेंडली नियमांमुळे अतिशय लोकप्रिय आहे. पण नुकतंच OYO ने आपल्या चेकइन पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. ज्या बदलानुसार अविवाहित जोडप्यांना परवानगी नसल्याच म्हटलं आहे. OYO ने नियमात बदल केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार मिम्स व्हायरल झाले आहेत.
OYO ने आपल्या पार्टनर हॉटेल्सना अधिकार दिले आहेत की, ते कोणत्या कपल्सला परवानगी देऊ शकतात किंवा नाकारु शकतात. पण या नव्या पॉलिसीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण OYO ची ही Bad Idea असल्याच सांगत आहेत.
OYO च्या नव्या नियमानुसार जोडप्यांना नात्याचं प्रमाणपत्र दाखवणं गरजेचं आहे. पण यामुळे OYO चं मोठं नुकसान होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एवढंच नव्हे तर यामुळे त्यांच्या सेल्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळेल असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे.
OYO rooms change rules, stating unmarried couples are no longer allowed.
Oyo Hotel Owners: pic.twitter.com/nWfWcAwQbj
— Ex Bhakt (@exbhakt_) January 5, 2025
Unmarried couples after hearing new oyo rules #oyorooms pic.twitter.com/sTfWnldvdE
— VARUN (@var) January 5, 2025
Oyo after changing its policy for unmarried couples #oyorooms pic.twitter.com/mMD2kQVPHq
— Darshannn (@D4Dramatic) January 5, 2025
OYO digging their own grave in india pic.twitter.com/fakTKJGMuL
— Ramen (@CoconutShawarma) January 5, 2025
Oyo to every customer now : https://t.co/Zr4nWO3UrE pic.twitter.com/lLFtURjwrg
— Yeh toh Rii hai (@itsriionly) January 5, 2025
PTI ने OYO उत्तर भारताचे क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांनी सांगितले की, "OYO सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्य पद्धती कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे OYO ने आपल्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. अविवाहित जोडप्याला आता OYO मध्ये रुम्स दिले जाणार नाहीत. कायद्याची अंमलबजावणी आणि नागरी समाजाचे ऐकण्याची आणि काम करण्याची आमची जबाबदारी देखील आम्ही ओळखतो, त्यामुळे ओयोने हे महत्त्वाचे बदल केले आहेत.