मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून चोरट्यांनी याद्वारे पावणे चार लाख लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी बुधवारी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मार्च महिन्यात बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचं कळतयं. त्यांनी याबाबत बँकेला विचारलं असता. त्यांना त्यांची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली मिळाल्याननंतर त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली.
एका कंपनीच्या खात्यात गेले पैसे
बोनी कपूर यांच्याकडे क्रेडिट कार्डबाबतची माहिती कुणीही विचारली नव्हती. तसंच कोणताही फोन त्यांना आला नव्हता. पण कार्ड वापरताना कोणीतरी डेटा मिळवला असल्याचा त्यांना संशय असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बोनी यांच्या खात्यातून ९ फेब्रुवारीला सायबर चोरटयांनी पाच व्यवहार करून त्याद्वारे तीन लाख ८२ हजार रुपये हस्तांतरित केले. गुडगाव येथील एका कंपनीच्या खात्यात पैसे गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.