आईच्या मैत्रिणीला ललित मोदीने अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात... लग्नाच्या काही वर्षांत 'अशी' झाली सुष्मिताची एन्ट्री!

दोन दिवसांपुर्वी ललित मोदीने एक फोटो शेअर करून सुष्मिता सेनला आपण डेट करत असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे

Updated: Jul 16, 2022, 05:55 PM IST
आईच्या मैत्रिणीला ललित मोदीने अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात... लग्नाच्या काही वर्षांत 'अशी' झाली सुष्मिताची एन्ट्री! title=

Lalit Modi Sushmita Sen dating: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती ललित मोदी आणि सुष्मिता सेनची. ललित मोदी हा एक गडगंज पैसावाला असून तो आयपीएलचा सर्वेसर्वा आहे. त्यातून ललित मोदी सुष्मिता सेनला डेट करत असल्याची चर्चा रंगल्याने आता मात्र ललितच्या पहिल्या लग्नाविषयीच्याही चर्चांना भलतेच उधाण आले आहे. आता ललित मोदी सुष्मिताशी लग्न करणार का ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार याबद्दलही नाना प्रकारच्या चर्चा सुरू आहे. 

दोन दिवसांपुर्वी ललित मोदीने एक फोटो शेअर करून सुष्मिता सेनला आपण डेट करत असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यातून बेटर हाफ असं सुष्मिताला ललितने संबोधल्याने हे दोघं एकमेकांच्या प्रेमात असल्याचे जरी जाहीर झाले तरी त्यासाठी ते लग्न करणार अशी चुणूक असताना आपण सध्यातरी विवाहित नाही, आपण सिगंल आहोत असं चक्क सुष्मिताने कबूल केले आहे. 

ललित मोदी हा एक बिझनेसमन असून त्याचे सुष्मिताच्या आधी एक लग्न हे झालेले आहे. ललित मोदीसह होणाऱ्या चर्चांमुळे सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंडशीही चर्चा रंगली होती. सुष्मिता आपण मॅरिड नसल्याचा खुलासा केल्याने आता या दोघांचे पुढे काय होणार याची सध्या सगळ्यांना प्रतिक्षा आहे. 

ललितने मीनल या नऊ वर्षांनी मोठ्या त्याच्या आईची मैत्रिणशी लग्न केले. मीनलचे लग्न मोडल्यानंतर ललितने तिच्याशी लग्न केल्याचा दावा केला गेला आहे. ललित जेव्हा परदेशात शिकण्यासाठी गेला होता तेव्हा तिथे त्याच्या आईच्या मैत्रीणीसोबत त्याचे संबंध आले आणि मग जवळीक वाढल्यावर मात्र तो तिच्या म्हणजे मीनलच्या प्रेमात पडू लागला. दोघांमध्ये वारंवार भेटीगाठी होत होत्या. सुरुवातीला त्यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या नाहीत. पण शेवटी मीनलकडे ललितने त्याच्या प्रेमाचा इजहार केला आणि त्याचवेळी मीनलचे दुसरीकडे लग्नही जुळत होते. पण ललितच्या प्रपोजचेही पुढे काही झाले नाही. त्यांच्यातला दुरावा वाढला आणि शेवटी मीनलने एका परदेशी बिझनेसमनशी लग्न केले. त्यानंतर मीनलचा डिवोर्स झाला आणि मग ललित तिच्या अधिक जवळ आला.  

ललित मोदी आणि सुष्मिता सेनबद्दल बोलायचे झाले तर दोघांची मैत्री खूप जुनी आहे. सुष्मिता ललित मोदी आणि त्याची पत्नी मीनल यांची खूप चांगली मैत्रीण आहे. 2018 मीनलचा मृत्यू झाला आणि तेव्हा सुष्मिताने ललितला भावनिक आधार दिला होता. तेव्हा सुष्मिता आणि ललित मोदी चांगलेच जवळ आले होते. 

सुष्मिता सेन याआधी रोहमल शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सहा महिन्यांपूर्वी लिव्ह-इन पार्टनर रोहमनसोबत ब्रेकअप झाल्याचे तिने जाहीर केले होते. असे बोलले जाते की ललित मोदीशी वाढलेल्या जवळीकमुळेच रोहमलसोबत सुष्मिताचे ब्रेकअप झाले.