दीदींना अखेरच्या प्रवासात बहीण आशाची साथ, शेवटचा फोटो डोळ्यात पाणी आणणारा

आशा भोसले यांनी सोडली नाही लता दीदी यांची सोबत 

Updated: Feb 7, 2022, 09:30 AM IST
दीदींना अखेरच्या प्रवासात बहीण आशाची साथ, शेवटचा फोटो डोळ्यात पाणी आणणारा title=

मुंबई : लता मंगेशकर एक असं व्यक्तीमत्व ज्यांना सरस्वती देवीचा दर्जा देण्यात आला होता. ९२ व्या वर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास तिरंग्यातून झाला. रविवारी सायंकाळी लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यविधी अगोदर लता मंगेशकर यांचा शेवटचा फोटो चाहत्यांसमोर आला आहे. 

लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून शिवाजी पार्कपर्यंत निघाली होती. यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ ज्येष्ठ गायिका आणि लता दीदी यांची बहिण आशा भोसले होत्या. 

लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन सख्ख्या बहिणींनी करोडो प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

आशा ताईंनी स्वतःचा आणि लता मंगेशकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो आशा आणि लता ताईंच्या बालपणातील आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या छायाचित्रासोबत आशा भोसले यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काय होते बालपणीचे दिवस, दीदी आणि मी.' आशा भोसले यांनी या कॅप्शनसोबत हार्ट शेपचा इमोजीही शेअर केला आहे.

कोकिळेसारख्या आवाजाने आपल्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या लता मंगेशकर यांच्या अखेरच्या दर्शनाला हजारो लोकांनी गर्दी केली होती. (एका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात)

त्यांच्या शेवटच्या फोटोत या महान गायिका तिरंग्यात होत्या. त्यांच्या शेजारी बहिण आणि लोकप्रिय गायिका आशा भोसले बसल्या होत्या. उपस्थित सर्व लोकं लता दीदींना अखेरचा सलाम करत होते.  

लता मंगेशकर यांनी आतापर्यंत अनेक पिढ्यांना आपल्या गाण्याने आनंद दिला आहे. त्यांच असं जाणं प्रत्येकाला चटका लावणार आहे. 

लता दीदी इथे नसल्या तरीही त्या आता स्वर्गात आपल्या गोड आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करतील. लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

लता दीदींना भावाने दिला मुखाग्नी 

लता मंगेशकर यांना त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला. हृदयनाथ मंगेशकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध संगीतकार आहेत. 

हृदयनाथ हे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांचे भाऊ आहेत.

हृदयनाथ मंगेशकर यांना त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी आणि संगीतासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

भीमसेन जोशी आणि जसराज यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र शासनाने पंडित ही पदवी देऊन गौरविले. याशिवाय हृदयनाथ मंगेशकर यांना 2009 साली पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.