Gautami Patil Dance Video : गौतमी पाटील हे नाव सध्या कुणाला ठाऊक नाही? तुम्ही तिला फॉलो करा किंवा करू नका, (Google) गुगलवर तिचं नाव सर्च करा किंवा करु नका. तिच्या नावाच्या चर्चाच इतक्या आहेत की नकळतच तिचा फोटो सोशल मीडियावर तुमच्या समोर येत असेल. Lavni Dancer अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) फॉलोअर्सचा आकडाही दिवसागणिक प्रचंड वाढताना दिसत आहे.
एका व्हायरल व्हिडीओमुळं (Gautami patil viral video) रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या या गौतमीनं गेल्या काही दिवसांत माध्यमांना मुलाखतीसुद्धा दिल्या. ज्या अश्लील नृत्यामुळं तिच्यावर ताशेरे ओढले गेले, त्याबाबत तिनं स्पष्टीकरणही दिलं. पाहता पाहता वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही गौतमी सोशल (Gautami patil instagram) मीडिया स्टार म्हणून प्रसिद्धीझोतात आली.
कालपर्वापर्यंत कोण कुठली गौतमी अनेकांना ठाऊकही नव्हती. पण, एका व्हायरल व्हिडीओनं तिला द्यायची ती प्रसिद्धी दिलीच. आता तर म्हणे ती चित्रपटातूनही झळकणार आहे. विविध कार्यक्रमांना दिसणारी ही सुंदरा आता मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळं तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गौतमीच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे, 'घुंगरु'. सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपी (Hampi) इतकंच नव्हे तर पार परदेशात थायलंडमध्ये तिच्या या चित्रपटाचं चित्रीकरणही पार पडलं आहे. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि लेखनही केल्याचं कळत आहे.
चित्रपटातून ती नेमकी कोणासोबत झळकणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असतानाच आता त्याचाही उलगडा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खुद्द बाबा गायकवाडच गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. एका लोकप्रिय मराठी मालिकेतून गायकवाड झळकले होते. कलेसोबतच राजकारण आणि समाजकारणाची त्यांना आवड. पण, आता गौतमीसोबत त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारही झळकणार आहेत. कलावंत आणि त्यातही लोककलावंतांच्या आयष्यावर कटाक्ष टाकणारा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का, यावरच आता अनेकांचं लक्ष आहे.