Guatami Patil : मी आता अश्लिल काही करत नाही तरीही... गौतमी पाटील थेटच बोलली

राष्ट्र विकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या मागणीवर गौतमी पाटीलने आपली थेट भूमिका मंडली आहे.

Updated: Dec 24, 2022, 12:05 AM IST
Guatami Patil : मी आता अश्लिल काही करत नाही तरीही... गौतमी पाटील थेटच बोलली  title=

Guatami Patil Viral Video :  सध्या सोशल मीडियावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालणाऱ्या  गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) एक झलक पाहण्यासाठी पोरं वेडीपिशी होत आहेत. गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमांना तुफान गर्दी होत आहे. अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. यावरुनच गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. राष्ट्र विकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या मागणीवर गौतमी पाटीलने आपली थेट भूमिका मंडली आहे.

सांगली येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेने केली आहे. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी सांगली पोलिसांकडे निवेदनाद्वारे गौतमीवर कारवाईची मागणी केली आहे.

डान्स कार्यक्रमांवर बंदीची मागणी होत असतानाच गौतमी पाटीलने या सर्व प्रकारवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  माझा कार्यक्रम पाहण्यासाठी फक्त पुरुष नाही तर महिला देखील येतात. सर्व प्रकारचे प्रेक्षक माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. त्यांच्या प्रेमामुळेच माझ्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होते असं गौतमी म्हणाली. 

सांगलीचा प्रकार गर्दीमुळे घडला. माझ्या कार्यक्रमला किती गर्दी होते याचा अंदाज मी नाही लावू शकत. मी स्टेजवर नाचत असते. त्यामुळे स्टेज खाली काय घडतयं हे मला कसं कळणार. यामुळे सांगलीच्या प्रकाराबद्दल मी काय बोलणार. माझ्या कार्यक्रमांना इतकी गर्दी होते की अनेकदा मला पोलिसांच्या व्हॅन मधून कार्यक्रम स्थलावरुन बाहेर पडावे लागते.    

मी चुकले, मी माफी मागितली.  मी एक कलाकार आहे.  मी आता अश्लिल काही करत नाही. माझ्याकडून आता काही चुकत नाही तरी माझ्या कार्यक्रमावर का बंदी घातली जात आहे. किती विरोध झाला तरी मी माझे कार्यक्रम घेत राहील. माझी कला सादर करत राहीन असं गौतमी म्हणाली.

सांगलीत काय घडलं होत?

सांगलीमध्ये (Sangli) बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. दत्तात्रय विलास ओमासे (44) असं मृत्यू व्यक्तीचं नाव आहे. गर्दीत दत्तात्रय ओमासे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत खुलासा केला. या कार्यक्रमात देखील प्रेक्षकांची अशीच हुल्लडबाजी पाहायला मिळाली होती. गौतमीला पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. यावेळी घरांच्या, शाळेच्या छतावर, झाडावर बसून प्रेक्षक गौतमी पाटीलचा डान्स पाहत होते. 

अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील चर्चेत

अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील चर्चेत आलेय. गौतमी तिच्या डान्सचे छोटे छोट्या क्लिप सोशल मीडियावर शेअर करत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी गौतमीची कानउघाडणी केली होती.