बिग बॉस मराठी ३' सिझनच्या संभाव्य स्पर्धकांची नावं लिक, पाहा कोण- कोण दिसणार

बिग बॉस मराठी' या रिएलिटी शोचा वेगळा ऑडियन्स आहे. 

Updated: Sep 4, 2021, 08:34 PM IST
बिग बॉस मराठी ३' सिझनच्या संभाव्य स्पर्धकांची नावं लिक, पाहा कोण- कोण दिसणार  title=

मुंबई : बिग बॉस मराठी' या रिएलिटी शोचा वेगळा ऑडियन्स आहे.  या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीजनची घोषणा काहिदिवसांपूर्वी करण्यात आलीये. त्यामुळे या आगामी सीजनमद्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावाबाबत देखील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आता कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील या शोमध्ये दिसणार आहेत ज्यांची नावं समोर आली आहेत.

हे कलाकार झळकणार 'बिग बॉस मराठी ३'मध्ये
या सिझनमध्ये कोण कोण झळकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. याबद्दलच्या अनेक बातम्या देखील अनेकदा समोर आल्या आहेत मात्र याबद्दल माहिती समोर आली आहेत. सुत्रांनुसार या सीझनमध्ये गायत्री दातार, भार्गवी चिरमुले, संग्राम समेळ, अक्षय वाघमारे, अंशुमन विचारे, नेहा खान, सुरखे कुडची रसिका सुनिल हे कलाकार झळकणार आहेत. पण ही अधिकृत नाहीत पण ही नावं सध्या चर्चेत आहेत.

याच बरोबर या कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील एक प्रसिध्द सेलिब्रिटी कपल दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र या जोडीचा ब्रेकअप झालं आहे. ही जोडी म्हणजे सुयश टिळक आणि अक्षया देवधर अभिनेत्री अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून पाठक बाई साकारत अख्या महाराष्ट्राची मनं जिंकली. तर सुयश 'का रे दुरावा' या मालिकेतून घराघरांत पोहोचला. सुत्रांकडून मिळालेल्या या महितीवर अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बिग बॉस मराठी ३ मध्ये नेमके स्पर्धक कोण आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.