MMS लिक वादानंतर Anjali Arora चा नवीन VIDEO आला समोर

MMS लीक वादानंतर अंजली अरोराचा नवीन व्हिडिओ, शेवटपर्यंत VIDEO बघण्याचं आवाहन का करतेय़? 

Updated: Aug 30, 2022, 07:57 PM IST
 MMS लिक वादानंतर Anjali Arora चा नवीन VIDEO आला समोर  title=

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार कंगना राणौतच्या प्रसिद्ध शो लॉक अपमधून प्रसिद्धी झोतात आलेली कच्चा बादाम गर्ल अंजली अरोरा (Anjali Arora) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला सोशल मीडिया सेन्सेशन म्हणूनही ओळखली जाते. याच सोशल मीडिया सेन्सेशनचा एमएमएस व्हिडिओ लिक झाल्याच्या बातम्या काही दिवसांपुर्वी प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. या बातम्यांवर तिने स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आता तिचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वीचं सोशल मीडियावर एक एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ अंजलीचा असल्याचं सांगण्यात येत होतं. या घटनेनंतर अंजलीला (Anjali Arora) अश्रू अनावर झाले होते. यावेळी तिने संतापत “त्यांच्याच कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत असं घडलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं?” असा सवाल ट्रोलर्सना केला होता. या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा एकदा तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने शेवटपर्यंत पाहण्याचे आवाहन केले आहे.   

व्हिडीओत काय? 
अंजली अरोराने (Anjali Arora)  तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंजली अरोरा पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावत आहे. खरंतर अंजलीचा हा व्हिडिओ इन्स्टा रीलचा ट्रेंड आहे, ज्यामध्ये ती सुरुवातीला साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे, पण शेवटपर्यंत पाहा असे तिने या व्हिडिओमध्ये चाहत्यांना आवाहन केले आहे. कारण त्यानंतर अंजलीचा (Anjali Arora)  लूक बदलतो आणि ती तिच्या नेहमीच्या शैलीत येऊन आपला हॉट लुक दाखवते. या व्हिडिओत साध्या कपड्यात असताना जूने गाणे वाजतेय, तर नवीन कपड्यात गेल्यावर रॉक बॅंड सारख गाण वाजतंय, आणि लुकही बदलतो. हा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.  

दरम्यान अंजलीचा (Anjali Arora)  हा लेटेस्ट व्हिडिओ नेहमीप्रमाणे वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओवर प्रचंड लाइक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.