लॉकडाऊनमध्ये गरीबांना मदत करणाऱ्या सोनू सूदचा पुतळा उभारला

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. 

Updated: Dec 23, 2020, 09:11 PM IST
लॉकडाऊनमध्ये गरीबांना मदत करणाऱ्या सोनू सूदचा पुतळा उभारला title=

मुंबई  :  कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. याचा प्रभाव सोनूच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील पडलाय. दरम्यान तेलंगाणातील डब्बा टेंडा गावातील लोकांनी खास सोनू सूदसाठी मंदीर उभारलं आहे. लॉकडाउनमध्ये या गावच्या लोकांची सोनू सूदने मदत केली होती, गावातील लोकांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे मंदिर उभारलं आहे. 

२० डिसेंबरला या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मंदिरामध्ये ग्रामस्थांनी सोनू सूदचा एक पुतळा बसवला. एवढच काय तर सोनू सूदच्या नावाने आरतीही करम्यात आली. आरतीनंतर ग्रामस्थांनी ‘जय हो सोनू सूद’ अशी घोषणाबाजीही केली. 
 
सोनू सूदचा पुतळा साकारणारे कलाकार मधुसूदन पाल म्हणाले, “आपल्या मदतशीर स्वभावाने या अभिनेत्यानं लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. त्यामुळे मी देखील त्यांना भेट म्हणून सोनूची छोटीशी मूर्ती तयार केली.” कोरोनाकाळात गरजवंतांची मदत केल्यानंतर आज सोनू सूद अनेकांसाठी सुपरहिरो बनलाय.