Tanusha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tanusha Sharma) आत्महत्या प्रकरणात आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. तुनिषाच्या मामाने तिच्या संदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. यात लव्ह जिहादचा अँगल असल्याचा दावा तुनिषाच्या मामाने केला आहे. पोलिसांनी देखील आता त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे(Tunisha Sharma Death Case).
शीजानशी मैत्री झाल्यानंतर तुनिषामध्ये बरेच बदल झाले होते. शीझानशी मैत्री झाल्यावर तुनिषा हिजाब घालायला लागली होती, अशी माहिती तुनिषाच्या मामांनी दिली आहे. हे लव्ह जिहादचंच प्रकरण असल्याचा संशयही तिच्या मामांनी व्यक्त केला आहे.
तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आज तिच्या आईचाही जबाब नोंदवला. तसंच तुनिषानं अलीबाबा दास्तान ए काबूल या सीरियलमध्ये काम केलं होते. त्या सीरियलमधल्या कलाकारांकडेही पोलीस चौकशी करत आहेत. तुनिषाचे मामा पवन शर्मांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामध्ये तुनिषाच्या मामांनी ही माहिती पोलिसांना दिली.
तुनिषा शर्मा ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. 24 डिसेंबरला तुनिषाने आत्महत्या केली. 24 डिसेंबरच्या दिवशी सेटवरच तुनिषाने शीजानच्या मेकअप रुममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीजान आणि तुनिषाने एकत्र लंच केला. त्यानंतर शीजान शुटिंगसाठी सेटवर गेला. या लंचदरम्यानच शीजान आणि तुनिषामध्ये काहीतरी बिनसल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळेच तुनिषाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तुनिषा आत्महत्याप्रकरणी शीजान खानवर आरोप करण्यात आले आहेत. तुनिषाच्या आईने शीजान खानविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे शीजान खानला अटक करण्या आली. शीजानवर तनुषाला धोका दिल्याचा तसंच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
तुनिषाच्या कुंटुंबियांनी लव्ह जिहादचा आरोप करण्याआदीच भाजपचे नेते राम कदम यांनीदेखील याप्रकरणावर भाष्य केलं होतं. आत्महत्येमागे लव्ह जिहाद संघटनेचा हात असेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत असून ते तुनिषाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देतील असे राम कदम म्हणाले होते.
तुनिषाची आई वनिताने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या त्यांनी शिझानवर गंभीर आरोप केले. त्यानं तिच्याशी लग्न करण्याचे आमिष धाखवले. तो आधीच एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये राहिला. त्यानं तिचा तीन ते चार महिने वापर केला. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की शिझानला शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला असचं सोडू नका. मी माझं मूल गमावलं आहे." पुढे त्या मीडियाचे आभार मानत म्हणाल्या की "मीडिया मला सतत मदत करत आहे." अस त्या या व्हिडिओत म्हणाल्या.