Made in Heaven वर प्रसिद्ध फॅशन डिझानरचा आरोप, Warning देत म्हणाले...

Tarun Tahiliani Made In Heaven: 'मेड इन हेवन S2'चं शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाहीये. त्यामुळे सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे एका लेखिकेनं केलेल्या आरोपांची. आता त्यानंतर चर्चा आहे ती म्हणजे एका सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरनं केलेल्या आरोपांची. यावेळी त्यांनी या सिरिजच्या कॉश्युम डिझानर्सवर आरोप केले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 19, 2023, 01:11 PM IST
Made in Heaven वर प्रसिद्ध फॅशन डिझानरचा आरोप, Warning देत म्हणाले... title=
August 18, 2023 | made in heaven controversy fashion designer tarun tahiliani puts allegations on the costume designers

Made in Heaven: सध्या चर्चा आहे ती म्हणजे Made in Heaven या वेबसिरिजची. यावेळी या वेबसिरिजवरून वाद निर्माण होतो आहे. त्यामुळे या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. काही दिवसांपुर्वी अगदी दोनच दिवसांपुर्वी दलित लेखिका याशिका दत्त हिनं सोशल मीडियावरून एक पोस्ट व्हायरल केली होती ज्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. तिनं या वेबसिरिजमधील पाचव्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेल्या राधिका आपटेच्या भुमिकेवरून आक्षेप घेतला होता. यावेळी तिनं या सिरिजमध्ये आपलं काम चोरलं असल्याचा आरोप केला होता. यावर झोया अख्तरनंही सडेतोड उत्तर दिलं असून यावरून तिचे सर्वच आरोप फेटाळले आहेत. तिनं सोशल मीडियावरूनही एक पोस्ट शेअर केली होती ज्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु आता एका सुप्रसिद्ध डिझायनरनं यावेळी आरोप घेतला आहे त्यामुळे या सिरिजमागील शुक्लकाष्ट काही जायचं नावं घेत नाहीये. 

यावेळी सुप्रसिद्ध डिझायनर तरूण ताहिलियानी यांनी या सिरिजच्या मेकर्सवर आरोप केलेले आहेत. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांनी केलेल्या आरोपांची. इन्टाग्रामवर त्यांनी स्टोरी टाकली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की यावेळी या सिरिजच्या कॉश्युम डिझायनर्सनी आमचा विश्वासघात केला आहे. त्यातून त्यांनी या संदर्भात तीन पोस्ट लिहिल्या आहेत. या सिझनच्या एका भागात मृणाल ठाकूरचा लग्नसोहळा टाकला आहे. ज्यात तरूण ताहिलियानी यांचे कॉश्चुम्स वापरले आहेत. परंतु त्याचे खोट्या पद्धतीनं सादरीकरण केल्यानं ते भडकले आहेत. यावेळी त्यांनी फार तिखट भाषेत टीका केली आहे. 

हेही वाचा : Made In Heaven मध्ये माझं काम श्रेय न देता चोरलं म्हणणाऱ्या लेखिकेला झोया अख्तरचं सडेतोड उत्तर...

''ही फारच दुर्देवाची बाब आहे की लोकप्रिय सिरिज ही कपड्यांची संकल्पनाच समजण्यातच यशस्वी ठरते. कारण, आम्ही फार विश्वासानं या कपड्यांचे योग्य पद्धतीनं सादरीकरण होईल या अर्थानं स्टाईलिस्टकडे सुपूर्द केले. परंतु दुर्दैव असं की, कल्पनिक डिझायनरनं त्याच्या काल्पनिक लेबलवरून आमच्या कपड्यांचे सादरीकरण केले आहे. हा तर विश्वासघात आहे. तर हेच करायचं होतं तर त्यासाठी सिरिजच्या मेकर्सनीच नवा कोणतरी डिझायनर आणि कॉश्चुम डिझायनर ठेवायला हवा होता.'' असं ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. 

यापुढे ते म्हणाले आहेत की, ''भविष्यात ही चूक कोणाकडून होता कामा नये. सोबतच आशा करूया की OTT वरून कोणाही बाबतीत असे प्रकार होणार नाहीत.'' सध्या त्यांची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होते आहे.