'बकेट लिस्ट' - माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

  बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अनेक वर्ष हिंदी सिनेमामध्ये रमली.

Updated: Jan 14, 2018, 02:05 PM IST
'बकेट लिस्ट' - माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज  title=

मुंबई :  बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अनेक वर्ष हिंदी सिनेमामध्ये रमली.

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेली भारतामध्ये परतली आहे. लग्न, संसार, मुलं यानंतर आता माधुरीने पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. 
 
 लग्नानंतर माधुरीने काही हिंदी सिनेमे आणि रिएलिटी शो केले. पण मूळची महाराष्ट्रीय मुलगी मराठी सिनेमात कधी येणार ? हा प्रश्न तिच्या अनेक मराठी चाहत्यांना पडला होता. अनेक वर्षांपासून मराठी सिनेप्रेमी आणि माधुरीच्या चाहत्यांना आज मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर याबाबातची गोड बातमी मिळाली आहे. 

 
 माधुरी मराठी सिनेमात 

  माधुरी दीक्षित पहिल्यांदाच 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून मराठी सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर माधुरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. 

 

 बकेट लिस्ट  

 सामान्य, मध्यमवर्गीय महिलेच्या स्वरूपातील माधुरी दीक्षितची छबी पोस्टरवर दिसत आहे. 'बकेट लिस्ट' माझी, तुमची ... आपल्या सगळ्यांची अशी टॅगलाईन पोस्टर दिली आहे.  
 
तेजस देवोस्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या उन्हाळ्यात 'बकेट लिस्ट" रसिकांच्या भेटीला येणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.